एक्स्प्लोर

Pranit More: मला एक संधी द्या...प्रणित मोरेचा माफीनामा; शोमधील वादावर अखेर स्पष्टीकरण, माफी मागत काय काय म्हणाला?

Stand-Up Comedian Pranit More: कॉमेडी शोमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या प्रणित मोरेनं अखेर मागितली माफी.

Pranit More Controversy: स्टँड - अप कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit More) आपल्या ऑडियन्समुळे चांगला कचाट्यात सापडला आहे.  त्याच्या शोमध्ये हिमांशू जांगडा (Himanshu Jangra) आणि डॉ. सेजल पवार (Sejal Pawar) या दोघांनीही अश्लील टिपण्णी केली होती. दोघांच्याही विधानांवर आक्षेप घेण्यात आला.  या दोघांचेही व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.  हिमांशूनं एका तरुणीला डेटवर नेल्याचा किस्सा सांगितला. तर, डॉ. सेजल पवार हिनं मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सवर अश्लील टिपण्णी केली.

यामुळे प्रणित मोरेच्या अडचणीत  वाढ झाली. गेल्या 2 दिवसांपासून त्याला धारेवर धरण्यात आलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही प्रणित मोरेच्या शोविरोधात अॅक्शन घेतली. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार असल्याचं सांगितलं. दरम्यान, या सगळ्या गदारोळानंतर प्रणित मोरेनं अखेर सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन माफी मागितली आहे. 

स्टँड अप कॉमेडीयन प्रणित मोरे याच्याकडून अखेर माफीनामा जाहीर (Pranit More Apologises Amid Controversy in Video)

प्रणित मोरेनं इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करुन सांगितलं की, 'हॅलो, खरंतर मला ही गोष्ट काही दिवसांपूर्वीच बोलायची होती. पण माझं इन्स्टाग्राम सस्पेंड झालं होतं. तुम्ही सर्वांनी माझा क्राऊड वर्कचा व्हिडीओ पाहिला असेल.  या व्हिडीओमुळे माझा लोकांकडून तिरस्कार केला जात आहे. मला असं वाटतं की, हा तिरस्कार मी  डिझर्व्ह करतोय.  कारण त्या तरुणासोबत जेव्हा मी क्राऊडवर्क करत होतो. तेव्हा त्यानं बऱ्याच अपमानास्पद गोष्टी बोलल्या. सर्व जण त्यावर हसत होते'.

प्रणित मोरेचा माफिनाम्याचा व्हिडीओ व्हायरल (Pranit More Apologies)

'मी देखील भावनेच्या भरात वाहून गेलो होते. तेव्हा माझ्याकडून चूक झाली. मी त्याला थांबवू शकलो असतो, एक बाजू घेऊ शकलो असतो, पण मी ही गोष्ट करु शकलो नाही. मी त्याला प्लॅटफॉर्म दिला आणि हे सगळं एवढं वाढत गेलं. जे कुणी यामुळे दुखावले गेले असतील, त्यांच्या सगळ्यांची मी माफी मागतो'

'कायदेशीर कारवाईला मी सहकार्य करतो. मला एक संधी द्यावी, मी एक चांगला माणूस बनून दाखवेन. मी माझ्या स्वतःवर आणि माझ्या कॉन्टेंटवर काम करेन', असं म्हणत प्रणित मोरेनं माफी मागितली. दरम्यान, प्रणित मोरेच्या माफिनाम्यानंतर त्यावर कोणती कारवाई केली जाईल? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

370 रुपयांच्या बिर्याणीचा वाद नेमका आहे तरी काय? (370 Biryani Controversy)

370 रुपयांच्या बिर्याणीचा वाद एका व्हायरल व्हिडीओमुळे सुरू झाला होता. प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमध्ये हिमांशू जांगडा नावाच्या तरुणानं एका तरुणीसोबतचा डेटवर गेल्याचा अनुभव सांगितला. 'बिर्याणीवर 370 रुपये खर्च केले, आता वसूल तर करावे लागतील ना...' असं म्हणत त्या तरुणानं तरुणीकडून बिर्याणीच्या खर्चाच्या बदल्यात तरुणीकडून शारीरिक जवळीक अपेक्षित असल्याचे सुचित केले. या विधानानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रणित मोरे, हिमांशू जांगडा आणि डॉ. सेजल पवार यांना धारेवर धरलं.

वाद हा केवळ हिमांशूपूरते मर्यादित न राहता, प्रणित मोरेनं यावर का आक्षेप घेतला नाही? हा प्रश्न उपस्थित करत नेटकऱ्यांनी प्रणितवरही टीकेची तोफ डागली. 

वाद केवळ हिमांशूपुरता मर्यादित राहिला नाही. शोदरम्यान त्या वक्तव्याला विरोध न केल्यामुळे आणि संबंधित क्लिप सोशल मीडियावर शेअर केल्याच्या आरोपांमुळे प्रणित मोरेलाही मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. अशा आक्षेपार्ह वक्तव्यांना 'कॉमेडी'च्या नावाखाली थारा देऊ नये, असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं. वाद अधिक चिघळल्यानंतर अखेर प्रणितला या सगळ्या प्रकारावर माफी मागावी लागली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

स्वामींची कृपा.. 'देऊळ बंद 2' सिनेमाची दमदार कमाई, शुक्रवारी कमावले 'इतके' कोटी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
Advertisement

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget