'वेल डन बेबी'म्हणत नवीकोरी मराठमोळी जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
रुपेरी पडद्याच्या माध्यमातून बहुविध चित्रपटांच्या माध्यमातून आजवर अनेक जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या जोड्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला चाहत्यांनीही चांगलीच पसंती दिली आहे.
मुंबई : रुपेरी पडद्याच्या माध्यमातून बहुविध चित्रपटांच्या माध्यमातून आजवर अनेक जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या जोड्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला चाहत्यांनीही चांगलीच पसंती दिली आहे. अशाच जोड्यांमध्ये आता एक नवीकोरी जोडी प्रेक्षकांच्ा भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.
अमेझॉन प्राइम व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ही जोडी आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता पुष्कर जोग याची. अॅमेझॉननेच 'वेल डन बेबी' या बहुप्रतिक्षित मराठी सिनेमाचा प्रीमिअर 9 एप्रिल 2021 रोजी करणार असल्याची घोषणा केली. सिनेमाचे नवे मोशन पोस्टर सादर करत ही घोषणा करण्यात आली. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सादर होत असणाऱ्या या नव्या सिनेमाचे दिग्दर्शन नवोदित प्रियंका तंवरने केले आहे. पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा कौटुंबिक सिनेमा आहे. यात विविध भावनांच्या मिश्रणासोबतच या सिनेमाची कथा प्रत्येकाला आपलीशीही वाटेल.
एका खऱ्याखुऱ्या प्रसंगारासून प्रेरित अशी हृदयस्पर्शी कथा आहे. आधुनिक जगातील एक तरुण जोडपं (अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग) आपल्या लग्नाचा उद्देश शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नशीबच त्यांना तो उद्देश देऊ करते. आत्मशोधाच्या मार्गावर घेऊन जाणारी 'वेल डन बेबी'ची कथा अत्यंत गुंतवून ठेवणारी असून ही कथा नक्कीच प्रेक्षकांची मने जिंकून घेईल असं सांगण्यात येत आहे.
या सिनेमाबद्दल अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोग म्हणाला, "वेल डन बेबी हा माझा प्रिय सिनेमा आहे. ही कथा मांडणे आणि व्यक्तिरेखांच्या भावभावनांचे हिंदोळे जिवंत करणे हा एक स्वतंत्र प्रवासच होता आणि मला आनंद आहे की अमेझॉन प्राइम व्हिडीओवर आमच्या प्रेक्षकांना ही कथा दाखवण्याचा संधी मिळाली."
View this post on Instagram
बहुआयामी अभिनेत्री अमृता खानविलकर हिनंही या सिनेमाचा भाग होता आल्याच्या भावना व्यक्त केल्या. "वेल डन बेबीची सुंदर कथा हृदयाला नक्की हात घालेल. ही मनोरंजक कथा तुम्हाला हसवेलही आणि प्रसंगी भावनिकही करेल. अनेक अर्थांनी आपली वाटावी, अशी ही कथा आहे. अमेझॉन प्राइम व्हिडीओच्या माध्यमातून देशभरातील आमच्या चाहत्यांना गुढीपाडव्याची भेट म्हणून हा सिनेमा सादर करताना मला फार छान वाटतंय", असे ती म्हणाली.