Jayam मधील गाण्यावर थिरकणारी अभिनेत्री आता कशी दिसते? सौंदर्य आजही भुरळ पाडेल, सिनेसृष्टीपासून दूर का गेली?
South actress Sadha Sayed : तमिळ, तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमधील अभिनेत्री साधाने 2002 मध्ये 'जयम' चित्रपटातून पदार्पण केले होते. आता ती कशी दिसते? आणि काय करते? जाणून घेऊयात..

South actress Sadha Sayed : साऊथमधील अनेक गाणी देशभरात गाजतात. अनेक गाण्यांचा आपल्याला अर्थ कळत नसतो. मात्र, ती ऐकायला भारी वाटतात. साऊथ मधील गाजलेला Jayam हा सिनेमा 2002 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमातील Chinnado या गाण्याने फक्त साऊथमध्येच नाही तर महाराष्ट्रात देखील धुमाकूळ घातला होता. मात्र, ही अभिनेत्री आता काय करते? आणि कशी दिसते? जाणून घेऊयात..
जयम चित्रपटातील गाण्याने प्रसिद्ध झालेल्या या अभिनेत्रीचं नाव आहे .. Sadha.. तमिळ चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर ती अचानक सिनेसृष्टीपासून दूर गेली. तिचे चाहते आजही आशेने वाट पाहत होते की ती पुन्हा एकदा तमिळ चित्रपटांत परतेल. पण आता ती तिच्या आवडीचं आणि निवांत आयुष्य जगत आहे.
ही दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री Sadha आहे. तिने 2002 मध्ये तेलुगू चित्रपट ‘जयम’मधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. हा चित्रपट नंतर तमिळमध्येही बनवण्यात आला होता, ज्यामध्ये रवी मोहनसोबत साधाने तमिळमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिने माधवनसोबत ‘एथिरी’ आणि ‘वर्णजलम’ या चित्रपटांमध्ये काम केलं. पण तिला खरी ओळख मिळाली 2005 मध्ये आलेल्या ‘अनियन’ या चित्रपटातून. हा चित्रपट दिग्दर्शक शंकर यांचा होता आणि यामध्ये विक्रम मुख्य भूमिकेत होता.
साधाने ‘प्रियसाकी’, ‘थिरुपति’ आणि 2007 मधील सुपरहिट ‘उन्नाले उन्नाले’ यांसारख्या चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. मात्र त्यानंतर ती तमिळ चित्रपटांतून गायब झाली. 2011 मध्ये तिने ‘पुलीवेषम’ आणि नंतर विनोदी अभिनेते वडिवेलु यांच्यासोबत ‘एली’ या चित्रपटात काम केलं. सध्या तिने चित्रपटसृष्टीपासून अंतर ठेवले आहे, तरीही तिचं सौंदर्य आजही अनेकांना भुरळ घालणारं आहे.
View this post on Instagram
साधाचं अजून लग्न झालेलं नाही. अनेकांना उत्सुकता असते की ती आता काय करत आहे, तर ती आता एक वन्यजीव छायाचित्रकार (Wildlife Photographer) म्हणून ओळखली जाते. ती जंगलात जाऊन प्राणी-पक्ष्यांचे फोटो काढते आणि त्याचे फोटो आणि व्हिडीओ ती नेहमी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
एका मुलाखतीत जेव्हा तिला विचारण्यात आलं की तिने अजून लग्न का केलं नाही, तेव्हा तिने उत्तर दिलं –"जर आपण लग्न केलं, तर आपली मोकळीक संपते. मी तेच करते जे मला आवडतं आणि मी खूप आनंदी आहे. मला वाटत नाही की लग्नानंतर मी हे सर्व करू शकेन की नाही."सधा सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिचे 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि चाहते तिला खूपच पसंत करतात.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
अजय देवगणच्या डान्स स्टेपचं नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग, बायको काजोलनेही नवऱ्यालाच मारला टोमणा, म्हणाली..
'तुम्ही माझी चेष्टा करत..', डान्स स्टेपवर प्रश्न विचारताच अजय देवगणचं गंभीरपणे उत्तर VIDEO























