Sonam Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) कुटुंबाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. सोनम कपूरचे सासरे हरीश आहुजा यांची तब्बल 27 कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. हरीश आहुजांच्या फरीदाबाद येथील कंपनी शाही एक्सपोर्ट फॅक्टरची 27 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चोरांनी ‘रिबेट ऑफ स्टेट अँड सेंट्रल टॅक्स अँड लेव्हीज’ (ROSCTL) परवान्याद्वारे ही फसवणूक केली आहे. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कंपन्यांना विशेष सूट देते, ज्याला ROSCTL परवाना अर्थात ‘रिबेट ऑफ स्टेट अँड सेंट्रल टॅक्स अँड लेव्हीज’ म्हणतात. सामान्य भाषेत याला डिस्काउंट कूपन म्हणता येईल. हरीशच्या कंपनीकडे किती रकमेचे आरओएससीटीएल परवाने आहेत हे आरोपींना समजले होते.  


बनावट डीएससी जारी करून केली फसवणूक


आरोपींनी बनावट पद्धतीने डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (डीएससी) जारी केले आणि नंतर आणखी काही औपचारिकता पूर्ण करून फसवणूक करत त्यांच्या खात्यातील पैसे हस्तांतरित केले. या आयडीवरून शाही एक्सपोर्ट कंपनीचे 27.61 कोटी रुपयांचे 154 आरओएससीटीएल परवाने ब्लॅक कर्व्ह कॉर्पोरेशनच्या नावावर हस्तांतरित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


9 आरोपी पोलीस कोठडीत


या प्रकरणी पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 26 जुलै 2021 रोजी, फरीदाबाद पोलिसांना सेक्टर 28 मध्ये असलेल्या शाही एक्सपोर्ट कंपनीकडून आरओएससीटीएल परवान्याद्वारे फसवणूक झाल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि देशाच्या विविध भागातून लोकांना अटक केली. पोलिसांनी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कर्नाटकातून नऊ जणांना अटक केली आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha