Victoria Marathi Film : मराठी मनोरंजन विश्वात 'व्हिक्टोरिया' (Victoria) या हॉररपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. 'व्हिक्टोरिया' या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog), सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आणि आशय कुलकर्णी (Aashay Kulkarni) हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हीरा सोहल ही अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असून, जीत अशोक आणि ‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस कुलकर्णी हे या चित्रपटामधून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.
‘वेल डन बेबी’ या चित्रपटांच्या यशानंतर आनंद पंडित मोशन पिक्चर एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट यांनी नुकतीच 'व्हिक्टोरिया'  या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर विराजस कुलकर्णीने एक खास पोस्ट लिहिली आहे.


काय म्हणाला विराजस?
‘It's a wrap for व्हिक्टोरिया! थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून आमची debut horror film तुमच्यापर्यंत पोहोचायला एक पाऊल पुढे आली आहे!’ अशी पोस्ट विराजसने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. 


पाहा पोस्ट :






'व्हिक्टोरिया'  चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. वैशल शाह हे सह निर्माता आहेत. गतवर्षी या चित्रपटाच्या मुहूर्त संपन्न झाला आणि या बिग बजेट चित्रपटाची शूटिंग स्कॉटलंड येथे होणार आहे. या चित्रपटामध्ये पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी  आणि आशय कुलकर्णी यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.


संबंधित बातम्या


Vatsala Deshmukh : जेष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख काळाच्या पडद्याआड, ‘पिंजरा’ चित्रपटात साकारली होती खलनायिका


Jhund : 'झुंड' काढण्यासारखं थोडं काही,वेचण्यासारखं खूप काही, लेखक क्षितिज पटवर्धनांनी सकारात्मक बाजू आणली प्रेक्षकांसमोर


The Kashmir Files : पहिल्याच दिवशी 'द कश्मीर फाइल्स'ची बॉक्स ऑफिसवर जादू, सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकांना अश्रू अनावर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha