Samantha Ruth Prabhu: ‘साऊथ क्वीन’ प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. समंथा ही अशा कलाकारांपैकी एक आहे, जी प्रत्येक मुद्द्यावर आपले मत बिनधास्त आणि उघडपणे मांडते. तिच्या दमदार अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी ओळखली जाणारी समंथा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्री नुकतीच मुंबईत आयोजित क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स 2022मध्ये सहभागी झाली होती.


यावेळी समंथाने अतिशय बोल्ड आणि सुंदर ड्रेस परिधान केला होता. या अवॉर्ड फंक्शनमध्ये समंथाने हिरव्या रंगाचा डीप नेक लाँग टेल गाऊन घातला होता. अवॉर्ड फंक्शनमध्ये अभिनेत्रीने तिच्या बोल्ड स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. समांथाचा हा लूक अनेकांना आवडला, तर अनेकांनी तिला तिच्या ड्रेसमुळे प्रचंड ट्रोल देखील केले.



समंथा ट्रोलर्सच्या निशाण्यावर


समंथाने माजी पती आणि अभिनेता नागा चैतन्य याच्याशी घटस्फोटाची घोषणा केल्यापासून, ती वारंवार ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. अशातच पुन्हा एकदा तिला तिच्या लूकमुळे ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागले. दरम्यान, या सर्व ट्रोलवर अभिनेत्रीने प्रत्युत्तर देत सर्वांना सणसणीत उत्तर दिले आहे. स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.


काय म्हणाली अभिनेत्री?


तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरीवर पोस्ट शेअर करताना समांथाने लिहिले की, 'मला एक महिला म्हणून पहिलाच मला याचे शिक्षण मिळाले आहे की, त्यांना कशा प्रकारे जज केले जाते. महिलांनी काय परिधान केले आहे, त्यांचा रंग, शिक्षण, समाजातील स्थान, त्यांचे व्यक्तिमत्व, त्वचेचा रंग यावरून आपण त्यांना जज करतो. ही यादी वाढतच जाते. एखाद्या महिलेवर तिच्या कपड्यांबद्दल टिप्पणी करणे, हे आपण करू शकतो ही सर्वात सोपी गोष्ट आहे.’


तिने पुढे लिहिले की, 'आता आपण 2022मध्ये आहोत, महिला काय परिधान करतात आणि कशा दिसतात यावरून आपण स्वत:ला सुधारण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो का? आपले आदर्श दुसऱ्यावर लादून कोणाचाच फायदा झालेला नाही. आपण एखाद्या व्यक्तीला ज्या प्रकारे जाणतो आणि समजून घेतो त्या पद्धतीचा पुन्हा एकदा विचार झाला पाहिजे.’


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha