सोनम कपूरकडे पुन्हा गूड न्यूज? चाळीशीला टेकलेली अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार
पहिल्या बाळानंतर सोनमने आपली ' मदरहुड जर्नी' सोशल मीडियावर फॅन्ससोबत शेअर केली होती. आता त्यांच्या घरात दुसऱ्या बाळाच्या आगमनाची चर्चा सुरू झाल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे

Sonam Kapoor expecting second child: बॉलिवूड एक्ट्रेस आणि अनिल कपूरची लाडकी लेक सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) घरात पुन्हा एकदा लहानग्या पाहुण्याची चाहूल लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सोनम दुसऱ्यांदा आई होणार असून ती आणि तिचा पती आनंद आहूजा दुसऱ्या बाळाच्या आगमनाची वाट बघत आहेत .सोनम लवकरच आपल्या सेकंड प्रेग्नन्सीबाबत अधिकृत घोषणा देखील करू शकते.
'वायू 'नंतर सोनमच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची चर्चा
सोनम आणि आनंद आहूजा यांनी 2018 मध्ये लग्न केले, आणि 2022 मध्ये त्यांच्या घरात मुलगा वायु जन्माला आला. पहिल्या बाळानंतर सोनमने आपली ' मदरहुड जर्नी' सोशल मीडियावर फॅन्ससोबत शेअर केली होती. आता त्यांच्या घरात दुसऱ्या बाळाच्या आगमनाची चर्चा सुरू झाल्यामुळे दोन्ही कुटुंबात आणि चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.सोनम आणि आनंद सध्या लंडनमध्ये आहेत .पण बहुतेकदा ते मुंबई आणि दिल्लीमध्ये आपला वेळ घालवताना दिसतात .अभिनेत्रीने ऑगस्टमध्ये तिचा मुलगा वायुचा वाढदिवस साजरा केल्यानंतर काही आठवड्यांनी आली आहे. तिच्या मुलासोबतचे हृदयस्पर्शी फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, ''ऑगस्ट महिना. वायुचा महिना. तो ज्या तीन शहरांना आपले घर म्हणतो त्या शहरात.' अशी पोस्ट तिने केली होती. सोनम वायूशी खेळतानाचे, त्याच्यासोबत वेळ घालवतानाचे क्षण सोशल मीडियावर शेयर करत असते.
View this post on Instagram
चाहत्यांचा आनंद द्विगुणित
सोनमने अद्याप दुसऱ्या प्रेग्नन्सीबाबत कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही, पण फॅन्स आतापासूनच तिच्या सोशल मीडिया पोस्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. तिच्या दुसऱ्या बाळाची ही गूड न्यूज समोर येताच चाहत्यांचा उत्साह दुपटीने वाढला आहे. पिंकव्हिलामधील एका वृत्तानुसार, सोनम सध्या तीन महिन्यांची गर्भवती आहे .लवकरच या जोडप्याकडून याबाबत अधिकृत घोषणा अपेक्षित आहे .
सोनमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सोनमने 2007 मध्ये संजय लीला भंसालींच्या 'सांवरिया' चित्रपटाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर तिने ‘दिल्ली-6’, ‘आएशा’, ‘खूबसूरत’, ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘ब्लाइंड’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोनम आणि आनंद यांना बॉलिवूडमध्ये पॉवर कपल म्हणून ओळखले जाते आणि त्यांच्या प्रेमाची आणि केमिस्ट्रीची चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चा असते. सोनमच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची ही बातमी समोर येताच फॅन्समध्ये उत्साह द्विगुणीत झाला आहे. लवकरच सोनमच्या घरात पुन्हा लहान बाळाची चाहूल लागल्याचं सांगितलं जात आहे .























