एक्स्प्लोर

Ghabadkund Smita Paygude Anjute: 'काय रे मरणार ना सगळे...?', गूढ नजर, अंगावर शहारे आणणारं ते हास्य; 'घबाडकुंड'मध्ये 'या' दिग्गज अभिनेत्रीची रहस्यमयी एन्ट्री!

Ghabadkund Smita Paygude Anjute: भुतांच्या भयावह अनुभवांनंतर गाव सोडून नव्या ठिकाणी स्थायिक झालेल्या दिल्याची ही कहाणी 'घबाडकुंड' सिनेमाच्या युनिव्हर्सला अधिक गूढ आणि रोमहर्षक बनवणार आहे.

Ghabadkund Smita Paygude Anjute: ओरस गावातील 'अल्याड-पल्याड'च्या गूढ आणि थरारक घटनांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा 'दिल्या' आता 'घबाडकुंड' युनिव्हर्समधील नव्या कथेत पुन्हा एकदा भेटणार आहे. भुतांच्या भयावह अनुभवांनंतर गाव सोडून नव्या ठिकाणी स्थायिक झालेल्या दिल्याची ही कहाणी 'घबाडकुंड' सिनेमाच्या युनिव्हर्सला अधिक गूढ आणि रोमहर्षक बनवणार आहे. 'घबाडकुंड' या नव्या सिनेमातून कल्पनेच्या पलीकडचं 'युनिव्हर्स' मराठीत मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला असून त्यांच्या या नव्या संकल्पनेला 'आयकॉन दी स्टाईल' संस्थेचे निर्माते डॉ. रसिक कदम यांची साथ लाभली आहे. 'घबाडकुंड' येत्या 19 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अनुभवी थिएटर आर्टिस्ट, कुशल मेकअप आर्टिस्ट तसेच 'आयकॉन दी स्टाईल'च्या संस्थापक सदस्य म्हणून ओळख निर्माण केलेल्या स्मिता पायगुडे अंजुटे (Smita Paygude Anjute) यांनी आपल्या कलात्मक प्रवासात अनेक पैलू यशस्वीपणे हाताळले आहेत. आता 'घबाडकुंड' सिनेमाच्या निमित्तानं एका वेगळ्या आणि गूढ भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. निर्माते रसिक कदम आणि दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून साकारत असलेला 'घबाडकुंड' हा सिनेमा येत्या 19 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ghabadkund Smita Paygude Anjute: 'काय रे मरणार ना सगळे...?', गूढ नजर, अंगावर शहारे आणणारं ते हास्य; 'घबाडकुंड'मध्ये 'या' दिग्गज अभिनेत्रीची रहस्यमयी एन्ट्री!

'रंगी' असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं  नाव आहे. सिनेमात ब्लॅक मॅजिक करताना दिसणारी 'रंगी' आपल्या तीक्ष्ण नजरेनं आणि भयावह उपस्थितीनं कथानकात वेगळीच रंगत आणताना दिसणार आहे. "नजरेत धग अन् रग हिच्या अंगी, भल्या-भल्यांना घाम फोडते... नाव हिचं रंगी...!", ही टॅगलाईन त्यांच्या व्यक्तिरेखेचं नेमकं वर्णन करते.                                                      

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना स्मिता सांगतात, 'घबाडकुंड'मधील 'रंगी' ही भूमिका माझ्यासाठी अत्यंत खास आहे. थिएटरमधील अनुभव आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून मिळालेली समज या व्यक्तिरेखेला आकार देताना खूप उपयोगी पडली’. ब्लॅक मॅजिकच्या पार्श्वभूमीवर उभी राहणारी 'रंगी' ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना नक्कीच लक्षात राहील, अशा भावना स्मिता पायगुडे अंजुटे यांनी व्यक्त केल्या.

पाहा व्हिडीओ : 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Star Pravah Upcoming Serial Suna Yeti Ghara Promo: स्टार प्रवाहवर आणखी एक नवी मालिका; नात्यांची भावस्पर्शी गोष्ट 'सुना येती घरा', दिग्गजांची मांदियाळी, Promo पाहिलात?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!
Sonu Sood On Kangana Ranaut: कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget