एक्स्प्लोर

Sidharth Malhotra Birthday Special : कोट्यवधींचा मालक सिद्धार्थ मल्होत्राची यशस्वी कारकिर्द

Sidharth Malhotra Birthday Special : बॉलिवूडचा 'शेरशाह' म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्राचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने त्याच्या यशस्वी करिअरचा घेतलेला आढावा.

Sidharth Malhotra Birthday Special : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा (Sidharth Malhotra)आज वाढदिवस. आपल्या बहारदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडणाऱ्या सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दमदार अॅक्टींग आणि अपार मेहनतीच्या जोरावर तो यशस्वी करिअरच्या टप्प्यावर आज उभा आहे. रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थची वार्षिक संपत्ती 6 कोटी आहे. तर महिन्याला तो 50 ते 60 लाख रूपये कमावतो. पण, चित्रपटांत अभिनय करण्याआधी सिद्धार्थ नेमकं काय काम करत होता हे तुम्हाला माहित आहे का? आज सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या जीवनाचे काही अनोखे किस्से जाणून घ्या.

वैयक्तिक खर्च काढण्यासाठी करत होता मॉडेलिंग :

सिद्धार्थ मल्होत्रा मूळचा दिल्लीचा आहे. त्याचे शिक्षणही दिल्लीतच झाले आहे. बारावीनंतर सिद्धार्थने दिल्ली युनिव्हर्सिटीच्या शहीद भगत सिंह कॉलेजमध्ये बीकॉम केले. यानंतर त्याने मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीला वैयक्तिक खर्च काढण्यासाठी सिद्धार्थने मॉडेलिंगमध्ये सुरु केलेले करिअरमध्ये त्याने बराच काळ मॉडेल म्हणून काम केलं आहे.  

सहकलाकारसुद्धा होता सिद्धार्थ मल्होत्रा :

सिद्धार्थ मल्होत्राने बॉलिवूडमध्ये अनेक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. या अभिनयानेच तो करिअरच्या यशस्वी टप्प्यावर आहे. पण, चित्रपटात अभिनय करण्याआधी सिद्धार्थ मल्होत्राने ट्रेनी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. 2010 साली शाहरूखच्या 'माय नेम इज खान' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने करण जोहरबरोबर सह दिग्दर्शकचे काम केले आहे. 

सिद्धार्थने नाकारले हे चित्रपट :

करिअरच्या सुरुवातीला सिद्धार्थने अनुभव सिन्हाच्या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती परंतु हा चित्रपट काही कारणास्तव पूर्ण होऊ शकला नाही. 2008 साली आलेल्या 'फॅशन' चित्रपटात मधुर भंडारकर यांनी सिद्धार्थला प्रियंकाच्या अपोझिट मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती. परंतु, त्यावेळी मॉडेलिंगमध्ये बिझी असलेल्या सिद्धार्थने या चित्रपटास नकार दिला. 

असा मिळाला चित्रपटात ब्रेक 
ज्यावेळी सिद्धार्थ 'माय नेम इज खान' चित्रपटासाठी सह दिग्दर्शकाचे काम करत होता. त्यावेळी त्याला अभिनयात करिअर करायचे आहे हे सगळ्यांना माहित होते. त्याच दरम्यान धर्मा प्रोडक्शनचा आगामी चित्रपट 'स्टूडंट ऑफ द इयर' साठी लोकांनी सिद्धार्थला ऑडिशन देण्यास सांगितले. धर्मा प्रोडक्शन चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात असताना सिद्धार्थच्या वाट्याला हा चित्रपट मिळाला. अशा प्रकारे सिद्धार्थला त्याच्या चित्रपट कारकिर्दीत पहिला ब्रेक मिळाला. 
सिद्धार्थने शेरशाह, स्टूडंट ऑफ द इयर, एक व्हिलन यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत. 

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


महत्त्वाच्या बातम्या

Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
The Kapil Sharma Show Comedian: 'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
'द कपिल शर्मा'शोच्या कॉमेडियनवर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन, कृष्णा अभिषेकने दिली माहिती
Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Bollywood Director on Tukaram Mundhe: 'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Brydon Carse Night Club VIDEO : नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
नाईट क्लबबाहेर हातात बेड्या... स्टार क्रिकेटरला पोलिसांनी घेतलं ताब्यात, रात्री नेमकं काय घडलं?, क्रिकेटविश्वाला हादरवणारा VIDEO
Amravati Hospital Fire baby death: अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Miss Universe India 2026: केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
केरळची काझिया लिझ मेजो ठरली 'मिस युनिव्हर्स इंडिया 2026' ची मानकरी; 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेतही करणार भारताचे प्रतिनिधित्व
Nagpur Chlorine Gas Leakage: नागपूरच्या गोधनीत विषारी क्लोरिन गॅसची गळती, भयंकर विषारी वायू, पिवळा फसफसणारा द्रव; पाहा PHOTOS
नागपूरच्या गोधनीत विषारी क्लोरिन गॅसची गळती, भयंकर विषारी वायू, पिवळा फसफसणारा द्रव; पाहा PHOTOS
IND vs SL 2nd TEST Day-2 LIVE : टीम इंडियाचा 6 शिलेदार परतला! ऋषभ पंत बॅटिंगसाठी मैदानात, भारताच्या डावाला आता मिळणार नवी दिशा? जाणून घ्या LIVE अपडेट
टीम इंडियाचा 6 शिलेदार परतला! ऋषभ पंत बॅटिंगसाठी मैदानात, भारताच्या डावाला आता मिळणार नवी दिशा? जाणून घ्या LIVE अपडेट
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
Embed widget