Siddharth Chandekar : मराठी इंडस्ट्रीतल्या 'पुणे लॉबी'विषयी सिद्धार्थ चांदेकरने व्यक्त केलं स्पष्ट मत, म्हणला, 'प्रत्येकाचा काम करण्याचा कंफर्ट झोन...'
Siddharth Chandekar : अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने इंडस्ट्रीतल्या पुणे लॉबीविषयी त्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. तसेच यावेळी त्याने त्याचा देखील अनुभव शेअर केला आहे.
Siddharth Chandekar : मुंबई-पुणे हा वाद गेली अनेक दशकं सुरु आहे. मुंबई ग्रेट ही पुणं भारी हा प्रश्न कायमच चर्चेचा आणि मिश्किल वादाचा विषय असतो. पण अद्यापही या प्रश्नाचं उत्तर काही सापडलं नाही. कारण दोन्ही शहरांचं महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलात एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरम्यान सिनेमांमध्येही हा वाद कायम पाहायला मिळतो. त्यातच मराठी इंडस्ट्रीमधल्या पुणे लॉबीची देखील कायम चर्चा होत असते. यावर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने (siddharth chandekar) त्याचं मत व्यक्त केलं आहे.
सिद्धार्थने कॉकटेल स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. सिद्धार्थही हा मुळचा पुण्याचा आहे. सिद्धार्थने त्याचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही पुण्यातून पूर्ण केलं आहे. मराठी सिनेसृष्टीतही अनेक कलाकारांची जन्मभूमी ही पुणे आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतही मुंबई-पुणे हा मिश्किल वाद कायम पाहायला मिळतो. त्यातच मराठी सिनेसृष्टीत पुणे लॉबी असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे. म्हणजे पुण्याची लोकं ही पुण्याच्याच लोकांबरोबर काम करतात, असा समज अनेकांचा आहे. यावरही सिद्धार्थने भाष्य केलं आहे.
सिद्धार्थने काय म्हटलं?
सिद्धार्थने यावर बोलताना म्हटलं की, 'पुण्याची लॉबी आहे, असा कधी मला अनुभव आला नाहीये. पुण्यातील जे लोक येतात ते भारीच असतात. पण अशी कोणती लॉबी आहे, असं मला नाही वाटतं. पण जर का अश्या लॉब्या व्हायल्या लागल्या तर मला नाही वाटत चांगले कोलॅबोरेशन होऊ शकतील. पण जर का अशा काही लॉबीज् असतील तर त्या पहिल्या मोडाव्यात. पण मला हेही वाटतं की प्रत्येकाचा त्या त्या माणसासोबत काम करण्याचा एक कंफर्ट झोन असतो.'
अशी लॉबी जर का असेल तर... - सिद्धार्थ चांदेकर
मी हेमंत ढोमेबरोबर काम करतो, तो पुण्याचा आहे म्हणून नाही तर तो गेली वीस वर्ष माझा मित्र आहे, तो उत्तम दिग्दर्शक आहे म्हणून मी त्याच्याबरोबर काम करतो. बरीच अशी लोकं आहेत जी पुण्याची निघालीत. पण ती पुण्याची आहेत, म्हणून मी त्यांच्याबरोबर काम करतो असं काही नाहीये. मात्र मला वाटतं की अशी लॉबी जर का असेल तर ती पहिली बंद व्हावी आणि वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या लोकांबरोबर कामं करावीत. मग भले ते काम कधी चांगलं होईल कधी फसेल पण कामात प्रयोग करत रहावेत, असं स्पष्ट मत सिद्धार्थने व्यक्त केलं आहे.
ही बातमी वाचा :