एक्स्प्लोर

Eetha Shraddha Kapoor: 'छावा' सिनेमातील अभिनेता 'ईठा'मध्येही झळकला, श्रद्धा कपूरसोबत मराठीत बोलला, भन्नाट किस्साही सांगितला

Shubhankar Ekbote on Shraddha Kapoor Eetha Sets: 'ईठा'च्या सेटवर श्रद्धा कपूरने शुभंकर एकबोटेचं कौतुक केलं.

Shubhankar Ekbote on Shraddha Kapoor: 'ईठा' (Eetha) या सिनेमाच्या टीझर (Eetha teaser) आणि फर्स्ट लूकनं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या सिनेमात श्रद्धा कपूरनं (Shraddha Kapoor) तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर(Vithabai Narayangaokar) यांची भूमिका साकारली असून, तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. तिची अदा, तिचे नृत्य आणि विठाबाईंची जीवनगाथा हे पाहण्यासाठी  प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी  आतुर आहेत. 'ईठा' या  सिनेमात श्रद्धा कपूरऐवजी इतर कलाकारांच्याही मुख्य भूमिका आहेत. या कलाकारांच्या यादीत अभिनेता शुभंकर एकबोटे याच्याही नावाचा समावेश आहे.  अनेक सिनेमा आणि टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा शुभंकर आता  'ईठा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या सिनेमाचे शूटिंग नेमके झाले कसे? श्रद्धा कपूरसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? या चित्रपटाच्या संबंधित अनेक किस्से त्याने शेअर केले आहेत. 

शुभंकर एकबोटेनं श्रद्धा कपूरसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला (Shubhankar Ekbote on Shraddha Kapoor)

अलिकडेच शुभंकर एकबोटे यानं  महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यानं 'ईठा' सिनेमात काम करतानाचा अनुभव शेअर केला. तसेच श्रद्धा कपूरने त्याचे कौतुक करत नेमकं काय म्हटलं? याची माहिती त्यानं मुलाखतीत दिली.  मिळालेल्या माहितीनुसार, शुभंकर एकबोटे याचे या सिनेमातील भूमिकेत थोडा उर्मटपणा आहे. श्रद्धा कपूरसोबत काम करतानाचा अनुभव शेअर करताना अभिनेता म्हणाला, 'श्रद्धा कपूर या उत्तम मराठी बोलतात.   त्यांना नक्कीच या सिनेमात काम करत असताना याचा फायदा झाला असणार.  त्या अगदी आपल्यासारखं मराठी बोलतात', असं शुभंकर म्हणाला.

'आमच्यात जे काही सेटवर बोलणं झालं ते मराठीतच झालं होतं.  या सिनेमात माझा एक सीन होता. सीन शूट करत असताना मला तिनं एक कॉम्पलिमेंट सुद्धा दिली होती. ती कॉम्पलिमेंट माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. सीननंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता. तुम्ही नाटकवाले ना? तुम्ही नाटकात काम  केलंय ना? खरंतर तुमचा अभिनय सुरू झाला आणि मला लगेच तुमच्यावर राग आला. म्हणजे तुमचं पात्र मला इतकं खरं वाटलं की तो राग माझ्या मनात आपोआप आला.  श्रद्धा कपूरसारख्या अनुभवी अभिनेत्रीकडून ही कॉम्पलिमेंट मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती', असंही शुभंकर म्हणाला. 

'श्रद्धा कपूर यांनी आपल्या कारकिर्दीत   बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलंय.  त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत मोठ्या दिग्दर्शकांसह काम केलं आहे. एकीकडे त्यांनी  हसिना पारकरसारखी भूमिका साकारली आहे. आता ते विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारत आहेत.  खूप छान वाटलं. या सिनेमात मराठी कलाकारांचीही फौज आहे.  मराठी कलाकारांसोबत काम करत असताना खूप छान वाटलं, वेळ घालवायलाही मिळालं.  सिद्धार्थ जाधव यांचीही या सिनेमात भूमिका आहे. त्यांच्यासोबत वेळ घालवता आलं, त्यांच्याकडून शिकता आलं', असं शुभंकर म्हणाला. शुभंकर याने सिनेमा तसेच मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यानं आपल्या कारकि‍र्दीत लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत 'छावा'सिनेमातही काम केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध अभिनेत्रीचं शुभमंगल सावधान! माजी मुख्यमंत्र्यांची बनली दुसरी बायको; लग्नाचे Photos व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Lata Mangeshkar Rejected Song: लता मंगेशकरांचं 'ते' रिजेक्टेड गाणं, दिग्दर्शकाला चित्रपटातही नको होतं, नंतर स्वतःलाच मूर्ख म्हणत उचललेला बूट
लता मंगेशकरांचं 'ते' रिजेक्टेड गाणं, दिग्दर्शकाला चित्रपटातही नको होतं, नंतर स्वतःलाच मूर्ख म्हणत उचललेला बूट
Kashmera Shah on Govinda and Sunita: गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सूनबाई भडकली; सुनीता आहुजाला सपोर्ट करत म्हणाली..., पोस्ट Viral
गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सूनबाई भडकली; सुनीता आहुजाला सपोर्ट करत म्हणाली..., पोस्ट Viral
Swarda Thigale Baby Girl: मुलगी झाली हो!प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट; 7 दिवसानंतर दिली गुडन्यूज, कारण...
मुलगी झाली हो!प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट; 7 दिवसानंतर दिली गुडन्यूज, कारण...
Albatya Galbatya: ‘अलबत्या गलबत्या’चा धुमाकूळ! 365 दिवसांत 333 प्रयोग हाऊसफुल्ल, आता नाटकातील गाणी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
‘अलबत्या गलबत्या’चा धुमाकूळ! 365 दिवसांत 333 प्रयोग हाऊसफुल्ल, आता नाटकातील गाणी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

व्हिडीओ

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
Satara: सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यात घडामोडींना वेग, नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच, शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट 
सातारा जिल्हा बँकेसाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु,शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर एकमत
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
Election : माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला, पुणे शिक्षक मतदारसंघातून रिंगणात उतरणार, विधानपरिषदेची रणधुमाळी सुरु  
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला,पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीची आशा
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
Embed widget