Shruti Haasan : गुपचूप लग्न उरकल्याच्या अफवांवर 'श्रुती हसन'ने सोडले मौन, म्हणाली..
Shruti Haasan : दाक्षिणात्य अभिनेत्री 'श्रुती हसन'ने तिच्या लग्नाच्या अफवांबाबत मौन सोडलं आहे. "मी अजून तरी विवाहित नाही. मी नेहमी माझ्याबाबत उघडपणे बोलत असते. मग मी माझ्या लग्नाबाबत का बोलणार नाही? लग्नाबाबत लपवण्यासारखे काय आहे?"
Shruti Haasan : बॉलीवुड अभिनेत्री श्रुती हसनच्या लग्नाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. अखेर 'श्रुती हसन'ने (SHRUTI HAASAN) तिच्या लग्नाच्या अफवांबाबत मौन सोडलं आहे. "मी अजून तरी विवाहित नाही. मी नेहमी माझ्याबाबत उघडपणे बोलत असते. मग मी माझ्या लग्नाबाबत का बोलणार नाही? लग्नाबाबत लपवण्यासारखे काय आहे?" असा सवालही तिने केला आहे. याशिवाय श्रुती हसनचा बॉयफ्रेंड शंतनू याने देखील लग्न झाल्याच्या केवळ अफवा आहेत, हे स्पष्ट केले आहे. "आमच्या व्यक्तीगत आयुष्याबाबत कोणत्याही अफवा पसरवू नयेत", असेही शंतनू म्हणाला आहे.
'ओरी'ची श्रुतीच्या लग्नबाबत पोस्ट व्हायरल
'ओरी'ने (ORI) श्रुतीच्या बॉयफ्रेंडला तिचा पती असल्याच्या एका पोस्टमधून म्हटले होते. त्यानंतर श्रुती हसनने गपचूप विवाह उरकल्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. मात्र, श्रुतीने अखेर आपल्या लग्नाबाबत मौन सोडलं आहे. तिने इन्साग्राम स्टोरीच्या माध्यमातून लग्नाबाबतच्या अफवा नाकारल्या आहेत. दरम्यान, शंतनू आणि श्रुती दोघांनीही लग्नाबाबतच्या अफवांवर पडता टाकला आहे.
सालारमधील भूमिकेमुळे श्रुती चर्चेत (Salaar)
दाक्षिणात्य अभिनेता प्रभास याचा सालार हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात श्रुती हसन मुख्य भूमिकेत आहे. सालारमधील भूमिकेमुळे श्रुती सध्या चर्चेत आहे. दरम्यान, तिच्या व्यक्तीगत आयुष्यााबाबत सोशल मीडियावर अनेक बातम्या समोर येत आहेत.
ओरी पोस्टमध्ये काय म्हणाला?
'ओरी'ने श्रुती हसनबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने श्रुतीच्या स्वभावाबाबत भाष्य केले होते. या पोस्टमध्ये ओरी म्हणाला की, "श्रुती माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी उभी राहिली नाही. कारण, मी तिला याबाबत विचारणा केली नाही. एका इव्हेंटमध्ये तिने माझ्यासोबत व्यवस्थित वागली नाही. त्यामुळे मला फार वाईट वाटले होते. पण काहीतरी गैरसमज झाला असेल. कारण मी तिच्या पतीसोबत चांगल्या पद्धतीने अॅप्रोच ठेवला होता."
बॉलीवुड सेलिब्रिटींच्या फोटोत दिसणारा 'ओरी' कोण आहे? (Bollywood Celebrities)
बॉलिवुड सेलिब्रिटींसोबत दिसणारा ओरी सध्या चर्चेत आहे. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याचे खरे नाव 'ओरहान अवत्रामणी' असे आहे. तो सोशल मीडियावरिल प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक आहे. आजवर अनेकदा बॉलिवुड सेलिब्रिटींच्या पार्टीमध्ये सहभागी झाला आहे. ओरीने त्याचे शिक्षण परदेशातून पूर्ण केले आहे. सारा अली खानसोबत तो अमेरीकेत शिक्षण घेत होता. त्याचवेळी दोघांमध्ये मैत्री झाली होती. उद्योगपती निता अंबानी पासून अनेक सेलिब्रिटींसोबतचे ओरीचे फोटो व्हायरल होत असतात.
इतर महत्वाच्या बातम्या