Shriya Pilgaonkar Talk About Father Sachin Pilgaonkar: 'सोशल मीडियावरचं जग असंच... शेवटी बाबांना...'; महागुरूंवर झालेल्या तुफान ट्रोलिंगवर काय म्हणाली लेक श्रिया पिळगांवकर?
Shriya Pilgaonkar Talk About Father Sachin Pilgaonkar: वडिलांना सातत्यानं केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवर श्रिया पिळगांवकरनं मौन सोडलं आहे. आम्हा कलाकारांना ट्रोलिंगची इतकी सवय झालीय की आम्हाला त्याबद्दल काही वाटेनासं झालंय, असं श्रिया म्हणाली.

Shriya Pilgaonkar Talk About Father Sachin Pilgaonkar: अगदी बालवयापासूनच फिल्म इंडस्ट्रीत आपलं योगदान देणारं मराठमोळं नाव म्हणजे, सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar). आजवर त्यांनी अनेक सिनेमांमधून आपलं अभिनय कौशल्य दाखवून दिलंच. पण, अनेक मराठी सिनेमांचं दिग्दर्शनही केलं. दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, गायक असलेल्या सचिन पिळगांवकरांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक सुपरडुपर हिट सिनेमे दिले. त्यांच्या सिनेसृष्टीतले अनेक अनुभव, काही किस्से सचिन पिळगांवकर यांनी आपल्या काही मुलाखतींमध्ये बोलताना सांगितले होते. यावरुन त्यांना प्रचंड मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. दरम्यान, सचिन पिळगांवकर यांना ट्रोल करण्यात आल्यानंतर आता पहिल्यांदाच त्यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgaonkar) हिनं मौन सोडलं आहे.
काही दिवसांपूर्वी 'महाराष्ट्र टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना श्रिया पिळगांवकरनं सचिन पिळगांवकरांच्या ट्रोलिंगबाबत सडेतोड वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीमध्ये तिला 'अभिनेते सचिन पिळगावकर यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले, तू या सगळ्याकडे कसे पाहते' असा प्रश्न विचारण्यात आला होता. आम्हा कलाकारांना ट्रोलिंगची इतकी सवय झालीय की आम्हाला त्याबद्दल काही वाटेनासं झालंय, असं श्रिया म्हणाली.
View this post on Instagram
सचिन पिळगांवकरांच्या ट्रोलिंगबाबत श्रिया नेमकं काय म्हणाली?
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिनेत्री श्रिया पिळगांवकरनं वडिलांच्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं. श्रियाच्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्रिया म्हणाली की, "ते सगळंच खेदजनक होतं. पण आम्हा कलाकारांना ट्रोलिंगची इतकी सवय झालीय की, आम्हाला त्याबद्दल काही वाटेनासं झालंय. ट्रोलर्सना काहीच काम नसतं, म्हणून ते आम्हा कलाकारांवर टीका करतात. शेवटी बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळतंय, त्यापुढे ट्रोलिंग काहीच नाही. लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर्स कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत. सोशल मीडियावरचं जग असंच आहे, त्यामुळे तिथल्या गोष्टी फारशा मनाला लावून घ्यायच्या नाहीत. कृतज्ञ राहून चांगलं काम करत राहायचं, हे आम्ही आमच्या मनावर बिंबवून घेतलं आहे."
दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर यांची लेक श्रिया पिळगांवकर सध्या चर्चेत आहे. तिची 'मंडाला मर्डर्स' ही वेब सीरिज नुकताच रिलीज झाली. या सीरिजमधील तिची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली.
























