एक्स्प्लोर

Shraddha Kapoor Eetha: प्रसूतीकळातही सादरीकरण, पाय थांबले नाही; 'ईठा' सिनेमाचा टीझर पाहून लेक भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाल्या...

Shraddha Kapoor Eetha Teaser: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाचा टीझर सोशल मीडियात व्हायरल.

Shraddha Kapoor Eetha Teaser: बॉलिवूडची क्यूट गर्ल श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिचा आगामी सिनेमा 'ईठा' (Eetha) च्या टीझरमुळे चर्चेत आहे.  या टीझरमध्ये (Entertainment) श्रद्धा कपूरची वेगळीच जादू पाहायला मिळत आहे. टीझर सोशल मीडियात लीक झाल्यापासून प्रेक्षकांकडून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. तिनं महाराष्ट्रातील लोककलाकार आणि लावणी नृत्यांगना स्व. विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका उत्तमरित्या वठवली आहे. तिचा फर्स्ट लूक पाहून चाहत्यांच्या अंगावर अक्षरश: काटा आला.  तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांनी आपल्या कारकि‍र्दीत बरेच चढ उतार पाहिले.  त्यांचा जीवन प्रवास नेमका कसा होता? हेच या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. दरम्यान, 'ईठा' सिनेमाचा टीझर लीक झाल्यानंतर विठाबाई नारायणगावकर यांची  कन्या  मंगला बनसोडे (Mangala Bansode) यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. 

'ईठा' सिनेमावर मंगला बनसोडे यांची प्रतिक्रिया (Mangala Bansode pay tribute to Vithabai Narayangaonkar)

स्व. विठाबाई नारायणगावकर या महाराष्ट्रातील महान तमाशा सम्राज्ञी होत्या. त्यांनी आपलं आयुष्य लोकलेसाठी वाहून दिलं होतं.  या सिनेमातून त्यांच्या आयुष्यातील अत्यंत गाजलेली घटना दाखवण्यात आली आहे. नऊ महिन्यांची गर्भवती असताना ते आपली कला सादर करत होते. तसेच प्रसूतीनंतरही पुन्हा रंगमंचावर जाऊन त्यांनी आपली कला सादर केली.  सत्य घटनेवर आधारीत या सिनेमाचा टीझर पाहून अनेकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्यांची कन्या मंगला बनसोडे यांनी सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली आहे.

मंगला बनसोडे यांनी  आपल्या पोस्टमधून आई स्व. विठाबाई नारायणगावकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच सिनेमाचं विशेष कौतुक केलं आहे.  त्यांनी  पोस्टमध्ये 'ईठा' सिनेमाचं पोस्टर आणि  आई विठाबाई नारायणगावकर यांच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.  त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'माझी आई स्व. विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनपटावरील ‘इठा’ चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. नारायणगावकर व शिवजन्मभूमीसाठी खऱ्या अर्थाने अभिमानास्पद बाब !! चित्रपट 28 ऑगस्टपासून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे'. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by सौ.मंगला बनसोडै (@mangala_bansode_official)

'ज्या व्यक्तिमत्त्वाच्या आवाजाने त्या काळात मंत्र्यांच्या गाड्या थांबत होत्या, ज्या व्यक्तिमत्त्वाने पोटात बाळ असताना सुद्धा रंगमंच सोडला नाही आणि त्याच रंगमंचावर कलाकृती सादर करत असताना बाळाला जन्म दिला अशा कलेच्या उपासक स्व. विठाबाई नारायणगावकर यांना खऱ्या अर्थाने ही आदरपूर्वक श्रद्धांजली आहे..' . सध्या मंगला बनसोडे यांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

स्व. विठाबाई नारायणगावकर यांचा जन्म तमाशाच्या वातावरणात झाला. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लोककलेसाठी वाहून दिलं. त्यांना आपल्या कारकि‍र्दीत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  लक्ष्मण उतेकर हा सिनेमा 28 ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2'ची हवा; 30 दिवस पूर्ण तरीही क्रेझ कमी झालेली नाही, 'राजा शिवाजी'चा रेकॉर्ड मोडणार?

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget