(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Marathi Movie : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर,'मंगला' सिनेमात साकारणार मुख्य भूमिका
Shivali Parab : अभिनेत्री शिवाली परब ही लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मंगला या सिनेमातून मुख्य भूमिकेत ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Shivali Parab : कल्याणची चुलबुली म्हणजेच अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi HasyaJatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहचली. पण आता छोटा पडदा गाजवल्यानंतर शिवाली मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. कारण शिवाली मुख्य भूमिकेत असलेला 'मंगला' हा चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे.
अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरु होती. आशयघन आणि भयावह कथेचा सार घेऊन मंगला हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतीच या सिनेमाची तारीखही जाहीर करण्यात आली. त्यामुळे शिवालीच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
'या' दिवशी येणार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
शिवाली परब मुख्य भूमिकेत असलेला मंगला हा सिनेमा येत्या 10 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या आणि भयावह हल्ल्यातून वाचलेल्या मंगला या सुप्रसिद्ध गायिकेचा प्रवास या सिनेमातून उलगडण्यात येईल. नुकतीच निर्मात्यांनी चित्रपटाची तारीखही जाहीर केलीय. चित्रपटाच्या पोस्टरवर शिवाली मंगला या भूमिकेत असून तिच्या चेहऱ्यावर झालेल्या ऍसिड हल्ल्याची खूण पाहायला मिळत आहे.
'रैश प्रोडक्शन प्रा.लि' आणि 'फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'मंगला' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे.चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे.चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे. एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवाली परबला मोठ्या पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :