(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiva Marathi Serial : शिवाचे स्टंट काही केल्या थांबेना, अभिनेत्रीने खऱ्या आजारपणातून उठून आता सीनसाठी थेट सिलेंडरच उचलला
Shiva Marathi Serial : शिवा मालिकेतील शिवा ही सातत्याने वेगवेगळे स्टंट करताना आपल्याला पाहायला मिळते.
Shiva Marathi Serial : 'झी मराठी' (Zee Marathi) वाहिनीवर सध्या 'शिवा' (Shiva) ही मालिका रंजक वळणावर आहे. नशिबाने शिवा आणि आशुतोषची लग्नगाठ बांधली. या लग्नानंतर शिवाच्या आयुष्यात सातत्याने अडचणी येत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच शिवा लग्नानंतरही आशुतोषच्या पाठीशी उभी राहत आहे.शिवा' मालिकेत शिवाचे कारनामे आणि कसोटी पाहण्यासाठी प्रेक्षक आवर्जून वाट पाहत असतात आणि हल्लीच एक सीन झाला जिथे शिवा सिलेंडर उचलते. ह्या सीनला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे.
शिवा वारंवार काही ना काही स्टंट करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने साडीत फाईटिंगचा सीन दिला होता. त्यानंतर आता शिवाने मालिकेत सिलेंडरच उचलला आहे. त्याविषयीचा अनुभव अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने शेअर केला आहे. हा सीन करण्यावेळी पूर्वा नुकतीच आजारातून उठली होती. त्यामुळे हा अनुभव पूर्वासाठी फार आव्हानात्मक होता, असा अनुभव पूर्वाने यावेळी सांगितला.
कशी झाली पूर्वाची तारेवरची कसरत?
पूर्वाने तिचा अनुभव शेअर करताना सांगितलं की, या सीनची गम्मत अशी की ज्या दिवशी शूटिंग झालं त्याच्या 3 दिवस आधी माझी तब्बेत प्रचंड बिघडली होती.त्या आधीच माझ्या कानावर आलं की, सिलेंडर उचलायचा एक सीन आहे.दिग्दर्शक सर आणि मी एकदम जोशात होतो की सिलेंडर उचलायचा आहे. पण जेव्हा मी आजारी पडले तेव्हा वाटलं की हे मला जमेल का कारण खूप अशक्तपणा आला होता. सरांनी प्रोत्साहन दिलं की डोक्यानी आणि मनानी शांत राहा सगळं बरोबर होईल.
शूट करतानाही खूप मज्जा आली - पूर्वा
पुढे पूर्वाने म्हटलं की, हे सगळं होत असताना दुसरीकडे कळलं की सिलेंडर मिळू शकला नाही. अर्धा भरलेला सिलेंडर होता तो, मी थोडी घाबरले, तुम्हाला सोशल मीडिया वर मी टाकलेल्या विडिओ मध्ये दिसलेच असेल की दिग्दर्शक सर आणि पूर्ण टीम कशी माझी मदत करत आहेत, माझी काळजी घेत आहेत. हे सगळं घडून आलं पूर्ण टीममुळे, कारण तो पूर्ण एक सीन होता मी तो सिलेंडर उचलून पुढं पर्यंत आणून, घरा पर्यंत नेऊन तिथे लावते. शूट करताना ही मजा आली आणि ह्याच श्रेय मी मारुती सरांना देते, असा अनुभव पूर्वाने शेअर केला.
View this post on Instagram