Shashank Ketkar On Smit Machchhar Flydubai Cockpit Attack: 'कॉकपीटमध्ये CCTV कॅमेरा का नसतो?'; Flydubai विमानातील भयंकर प्रकारानंतर मराठी अभिनेत्याचा सवाल, नेटकरीही कोड्यात
Shashank Ketkar On Smit Machchhar Flydubai Cockpit Attack: काही दिवसांपूर्वी फ्लायदुबईच्या विमानात घडलेल्या भयंकर प्रकारावर मराठी अभिनेत्यानं प्रश्न उपस्थित केलाय.

Shashank Ketkar On Smit Machchhar Flydubai Cockpit Attack: 'होणार सून मी ह्या घरची' (Honaar Soon Mee Hyaa Gharchi), 'मुरांबा' (Muramba) यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला मराठी अभिनेता (Marathi Actor) शशांक केतकर (Shashank Ketkar) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच सक्रिय असतो. शशांक केतकर (Marathi Actor Shashank Ketkar) नेहमीच अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर व्यक्त होत असतो. सध्या शशांकनं सोशल मीडियावर पोस्ट करुन उपस्थित केलेला प्रश्न सध्या चर्चेत आहे. मराठी अभिनेता शशांक केतकर यानं फ्लायदुबई विमानाच्या (Flydubai Plane) कॉकपीटमध्ये (Plane Cockpit) घडलेल्या भयंकर प्रकरणावर पोस्ट करुन शशांक केतकरनं प्रश्न उपस्थित केलेत.
काही दिवसांपूर्वी फ्लायदुबईच्या एका विमानात, एका ओमानच्या सह-वैमानिकानं 174 प्रवाशांचा जीव धोक्यात घालून विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न केलेला. त्यावेळी ओमानी पायलटसोबत असलेल्या भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी स्वतःच्या जीवाची बाजू लावून सर्व प्रवाशांसह सुखरुप विमान लँड केलं. ओमानी पायलटनं केलेल्या हल्ल्यात स्मित मच्छार यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्मित मच्छार यांचं कौतुक केलं असून अनेक कलाकारांनीही स्मित यांच्या धाडसाचं कौतुक केलंय. अशातच मराठी अभिनेता शशांक केतकर यानं एक पोस्ट करुन या घटनेवरुनच एक प्रश्न उपस्थित केलाय.
शशांक केतकर फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हणालाय? (Shashank Ketkar Facebook Post)
शशांक केतकरनं सोशल मीडियावर पोस्ट करत प्रश्न उपस्थित केलाय. शशांक म्हणालाय की, "या आधीही पडला होता... आता पुन्हा एकदा मला तोच प्रश्न पडला आहे… ज्यांना यातली Technical माहिती आहे, त्यांनी सांगावे! विमानात… कॉकपीटमध्ये CCTV कॅमेरा का नसतो?"
शशांक केतकरनं पुढे बोलताना विचारलंय की, "2026 मध्ये आहोत आपण… तंत्रज्ञान इतके पुढे गेलेले असताना, साध्या साध्या बसमध्ये पण कॅमेरा असतो, लोकल ट्रेनमध्ये कॅमेरा असतो… विमानात अजूनही का नसतो???? तांत्रिक कारण काय असावं?"

शशांक केतकरच्या प्रश्नानंतर नेटकरीही हैराण
शशांक केतकरनं विचारलेल्या प्रश्नानं अनेकांना हैराण केलंय. अनेकांनी शशांकच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. तर, काहींनी खरंच त्याला पडलेला प्रश्न योग्यच आहे, असं म्हटलं आहे. तर काहींनी मिश्किल कमेंट करुन अभिनेत्याला ट्रोल करण्याचा प्रयत्नही केलाय.

एका युजरनं लिहिलंय की, "एक अर्ज टाका कोर्टात की, मला माझ्या खर्चाने विमानात कॅमेरा बसवायचा आहे म्हणून…", तर अजून एका युजरनं सविस्तर कमेंट करत लिहिलंय की, "त्याला तसं काही ठोस कारण नाहीये. एकतर कॅमेरा असावा असं काही बंधन नाहीये, अनेक पायलटचा या गोष्टीला विरोध आहे. दुसरं, विमानातील CVR आणि FDR तंत्रज्ञान आधीच भरपूर माहिती गोळा करतात, ज्यातून तपासकामी येणारी बहुतेक माहिती मिळतेच. तिसरं, जगातील प्रत्येक विमानात CCTV बसवायचा म्हटलं तरी त्यामागे येणारा खर्च प्रचंड वाढेल, त्यासाठी लागणारी यंत्रणाही किचकट आणि खर्चिक आहे. त्यामुळे व्यावसायिक विमान कंपन्या स्वेच्छेनं हा खर्च करणार नाहीत..."






















