Shashank Ketkar : 'माझं मत वाया गेलं नसेल, अजूनही देश सुधारेल'; शशांक केतकरच्या पोस्टने वेधलं लक्ष
Shashank Ketkar : अभिनेता शशांक केतकर याने पुन्हा एकदा रस्त्यावरील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
Shashank Ketkar : अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा त्याच्या सोशल मीडियावरुन वारंवार त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील गंभीर समस्यांवर भाष्य करत असतो. त्याचप्रमाणे तो अनेकदा रस्त्यावरील कचऱ्याच्या परिस्थितीवरही संताप व्यक्त करत असतो. तसेच तो त्या व्हिडीओमध्ये मुंबई महानगरपालिकेलाही टॅग करुन या संपूर्ण परिसराची गंभीर दखल घेण्याचीही विनंती करतो. पुन्हा एकदा शशांकने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करत या संदर्भात भाष्य केलं आहे.
दरम्यान शशांकने त्याच्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या व्हिडीओला कॅप्शन देखील दिलं आहे. त्याने म्हटलं की,'मला कल्पना आहे की, हे एकच ठिकाण नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात असे हजारो स्पॉट्स आहेत जिथे कचरा जमलेला असतो.बदलाची सुरवात ही छोट्या छोट्या अॅक्शन्समधूनच होत असते. जर महापालिका आणि कचरा टाकणारी जनता निर्लज्ज आहे तर मग मलाही निर्लज्जा सारखं हे पुन्हा पुन्हा निदर्शनास आणून द्यावं लागणार. मी व्हिडीओ बघणाऱ्या जनतेलाही हेच सांगेन… सहन करू नका!!! कचरा दिसेल तिथे व्हिडीओ शूट करुन तुमच्या महानगरपालिकेला टॅग करा...निदर्शनास आणून द्या.माझं मत वाया गेलं नसेल, अजूनही देश सुधारेल …अशी आशा करतो…सगळे मिळून प्रयत्न करूया स्वच्छ देश घडवूया..'
शशांकने शेअर केला व्हिडीओ
फिल्मीसिटीचा एन्टरन्स मला कधीच निराश करत नाही. कचरा उचलणाऱ्या मातेला आणि उकिरड्यावर असणाऱ्या या राज्यमातेला नमस्कार करुन फिल्मसिटीच्या आतमध्ये जाऊया आणि बघुया आणखी थोडा कचरा..त्यानंतर शशांक फिल्मसिटीमधल्या ओल्या कचऱ्याच्या पेट्या दाखवतो. त्यावर तो म्हणतो की, फिल्मसिटीच्या या ओल्या कचऱ्याच्या पेट्या आहेत पण त्यामध्ये सगळं प्लास्टिक आहे. कदाचित या प्लॅस्टिकच्या पिशव्या ओल्या असतील.कचरा बघितलात,हास्यास्पद आहे ना? मागच्या वेळी मी फिल्मसिटीचा एक व्हिडीओ टाकला होता आणि त्याची लगेच महापालिकेने दखलही घेतली होती. तिथला तो परिसर स्वच्छही केला. पण त्यानंतर मी फिल्मसिटीमध्ये किमान 15 वेळा तरी आलो असेन..परिस्थिती जैसे थेच आहे..त्याच स्पॉटवर पुढच्या दिवसापासून तसाच कचरा जमलेला असतो...
पुढे शशांकने म्हटलं की, खूप वाट पाहिली...खूप वाट पाहिली...पण काहीच फरक पडला नाही.म्हणून आजचा हा पुन्हा एकदा व्हिडीओ करतोय.. महापालिका तुम्हाला प्रॉब्लेम लक्षात येतोय ना..तोंडदेखलं आम्ही प्रत्येक भागात अशा कचऱ्याच्या पेट्या ठेवलेल्या आहेत...इतकं करुन मोकळे होऊ नका..आपल्या समोरचं संकट खूप मोठं आहे..आपली लोकसंख्या खूप आहे,त्यामुळे कचरा खूप जास्त निर्माण होतो..त्यामुळे अशी खूप घाणेरडी ठिकाणं असणार आहेत. त्यामुळे तिकडे फक्त दोन-चार असे तुटलेले डब्बे ठेवण्यापेक्षा जितकी लोकसंख्या तितके कचऱ्याचे डब्बे, तितकी कचरा गोळा करण्याची ठिकाणं असाईन करा..मला माहितेय तुम्ही सांगाल अरे वर एका पुलाचं काम सुरु आहे, पण ही सगळी कामं सुरु आहे म्हणून रस्त्यावर कचरा ही जनता खपवून घेणार नाही.तेव्हा आवरा ते..
View this post on Instagram