Marathi Actress : 'लालबागचा राजा'च्या मंडपात अभिनेत्रीला धक्काबुक्की, मराठी अभिनेत्री म्हणाली, 'जिथे योग्य वागणुक दिली जात नाही...'
Marathi Actress : लालबागच्या राजाच्या मंडपात एका अभिनेत्रीला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला. त्यावर आता एका मराठी अभिनेत्री पोस्ट चर्चेत आली आहे.
Marathi Actress : लालबागच्या राजाचं (Lalbaugcha Raja) दर्शन घेण्यासाठी मोठमोठ्या उद्योगपतींपासून, कलाकार, राजकारणी ते अगदी सर्वसामान्यांची तुफान गर्दी होत असते. त्यामुळे त्या मंडपात धक्काबुक्की होणं, चेंगराचेंगरी होणं अशा बातम्या दरवर्षी समोर येतात. पण यंदा एका अभिनेत्रीलाच धक्काबुक्की झाल्याची बातमी समोर आली. सोशल मीडियावर या अभिनेत्रीचा तिचा हा अनुभव शेअरही केला. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. पण या सगळ्यावर आता एका मराठी अभिनेत्रीची (Marathi Actress) पोस्ट बरीच चर्चेत आलीये.
'कुमकुम भाग्य' आणि 'पांड्या स्टोअर'ची अभिनेत्री सिमरन बुधरूपला हिला हा अनुभव आला होता. त्यानंतर नवरी मिळे हिटलरला फेम अभिनेत्री शर्मिला राजाराम शिंदे हिची पोस्ट बरीच चर्चेत आली. तसेच या सगळ्यावर शर्मिलाने अगदी सूचक वक्तव्यही केल्याचं पाहायला मिळालं आहे.
शर्मिलाची पोस्ट काय?
शर्मिलाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, 'मी लहान होते तेव्हा आमची आई आम्हाला खूप कष्टाने मानाच्या गणपतींचं दर्शन घडवायची. गर्दीत चेंगरत चेंगरतच दर्शन घ्यायचो आम्ही सुद्धा… पण, आता मी एक कलाकार आहे. मला फार प्रेमाने आणि आदराने मंडळं आरतीसाठी आमंत्रित करतात म्हणून मी जाते. इतरांनी ज्या मंडळांमधे योग्य वागणूक दिली जात नाही तिथे जाणं टाळा. देव सर्वत्र आहे. घरी बसून नमस्कार करा. आपला माणुसकीचा कोटा (Quota) high ठेवा. आपल्या आई वडिलांची काळजी घ्या. त्यांची म्हातारपणी सेवा करा. माणसांसाठी आणि इतर प्राणिमात्रांसाठी मनात दया-माया असुद्या. दुसऱ्यांच्या लेकरांना स्वतःच्या लेकरांप्रमाणे प्रेमाने वागवा. बास! यापेक्षा मोठी भक्ती काय असेल. गणपती बाप्पा मोरया! PS : जी मंडळं भाविकांना नीट वागवतात तिथे भाविकांनी सुद्धा सहकार्य करावे.'
View this post on Instagram
अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?
सिमरनने या घटनेचा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून लालबागचा राजच्या मंडपात असलेल्या बाउंसरने तिच्यासोबत आणि आईसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. या व्हिडिओद्वारे सिमरनने संपूर्ण घटना आणि तिच्यासोबत काय घडले हे तपशीलवार सांगितले आहे. सिमरनने म्हटले की, “मी माझ्या आईसोबत लालबागच्या राजाकडे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो, पण तेथील कर्मचाऱ्यांच्या वर्तवणुकीमुळे आम्हाला वाईट अनुभव आला. माझ्या आईचे फोटो काढत असताना त्या ठिकाणच्या एका व्यक्तीने फोन हिसकावून घेतला असल्याचे सिमरने म्हटले. माझी आई माझ्या मागेच दर्शनासाठी रांगेत होती आणि आम्ही कोणताही जास्त वेळ घेत नव्हतो. आईने पुन्हा फोटो खेचण्याच सुरुवात केली तेव्हा त्यांनी पु्न्हा खेचण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोंधळात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाउंसरने माझ्या सोबत गैरवर्तवणूक केली.
ही बातमी वाचा :