Shah Rukh Khan Salman Khan Got Angry Karan Arjun Set: 'शाहरुखनं काठीनं मारमार मारलेलं, सलमान रागानं लाल-लाल झालेला...'; 'करण अर्जुन'च्या सेटवर झालेला राडा, 30 वर्षांनी खळबळजनक खुलासा
Shah Rukh Khan Salman Khan Got Angry Karan Arjun Set: 30 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'करण अर्जुन'च्या सेटवर खूप मोठा राडा झालेला. सलमान खान चिडलेला आणि शाहरुख खान तर काढी घेऊन मारत सुटलेला.

Shah Rukh Khan Salman Khan Got Angry On Karan Arjun Set: बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) नुकतीच वयाची साठी गाठली आहे. अशातच सध्या शाहरुखबाबतचे किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका सुप्रसिद्ध कोरियोग्राफरनं (Choreographer) चिन्नी प्रकाशनं (Chinni Prakash) लेटेस्ट इंटरव्यूमध्ये बोलताना शाहरुख आणि सलमान खानचा (Salman Khan) एक हादरवणारा किस्सा सांगितला. कोरियोग्राफरनं 'करण अर्जुन'च्या (Karan Arjun) सेटवरच्या आठवणी सांगितल्या. यावेळी त्यानं एक किस्सा शेअर केला. कोरियोग्राफर सांगितलं की, जेव्हा शूट सुरू असलेल्या ठिकाणी काहीजण मुलींशी गैरव्यवहार करत होते, त्यावेळी शाहरुख आणि सलमान खान दोघेही सेटवर काही मुलींच्या बचावासाठी पुढे आलेले.
कोरियोग्राफर चिन्नी प्रकाश यांनी 'करण अर्जुन'मधलं गाणं 'भांगड़ा पाले'च्या शूटिंगवेळच्या आठवणी जागा केल्या. त्यांनी यूट्यूब चॅनल 'फ्राइडे टॉकीज'वर बोलताना सांगितलं की, "हे गाणं आयकॉनिक गाणं होतं, कारण दोन्ही हिरो एकत्र डान्स करत होते, आणि दोघेही त्यावेळचे भविष्यातले सुपरस्टार होते. सलमान माझ्या खूपच जवळचा होता, कारण मी त्याच्यासोबतचा दुसरा सिनेमा करत होतो. शाहरुखसोबत त्याचा एवढा क्लोज बॉन्ड नव्हता..."
सेटवर राडा, शाहरुख काठी घेऊन धावला अन्...
कोरियोग्राफरनं एका घटनेबाबत सांगितलं की, "करण अर्जुन'च्या शूटिंगवेळी काही गावातल्या तरुणांनी सेटवरच मुलींची छेड काढायला सुरुवात केलेली. त्यावेळी सेटवर खूपच राडा झालेला. सेटवर सलमान खान आणि शाहरुख खान होते, दोघांनाही खूप राग आलेला, सलमान रागानं लाल-लाल झालेला. तेवढ्यात शाहरुखनं जवळच असलेली काठी उचलली आणि मुलींची छेड काढणाऱ्यांना मारायला सुरुवात केली. खूप मोठा राडा झालेला. नंतर सलमान, मी आणि शाहरुख सर्व मुलींना एका वॅनमधून हॉटेलवर घेऊन गेलो..."
गेस्ट हाऊसच्या गच्चीवर करायचो रिहर्सल
कोरियोग्राफर चिन्नी यांनी सांगितलं की, त्यावेळी सर्वचडण एका गेस्ट हाऊसमध्ये थांबलेले आणि तिथेच गच्चीत रिहर्सल करत होते. राकेश रोशन स्वतः सर्वजण रिहर्सल करतायत की, नाही... हे पाहायचे.
दरम्यान, बॉलिवूडच्या कल्ट सिनेमांच्या यादीत समाविष्ट होणारा 'करण अर्जुन' सिनेमा 13 जानेवरी, 1995 मध्ये थिएटर्समध्ये रिलीज झालेला आणि बॉक्स ऑफिसवर खूप मोठा हिट ठरलेला. शाहरुख खान आणि सलमान खान यानंतर कित्येक सिनेमांमध्ये एकत्र दिसलेले. पण, लीड रोलमध्ये 'करण अर्जुन'मध्येच दिसलेले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
एक सीरियल अन् 55 रोल, अभिनेता अगदी सहज म्हणून गेला, '30 ईयर्स का एक्सपीरियंस है' अन्...























