Shah Rukh Khan : भारताचा सुपरस्टार किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही लोकं शाहरुख खानला ट्रोल करत आहेत. या ट्रोलिंगचं कारण आहे लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी शाहरुखने केलेली एक कृती. लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी वाचलेली दुआ आणि त्यानंतर हात जोडून केलेला नमस्कार. एवढं सगळ ठीक होतं, पण त्यानंतर त्याने जे काही केलं त्यामुळे तो काही लोकांच्या निशाण्यावर आलाय तर काही लोक त्याच्या समर्थनार्थ देखील उतरले आहेत. 


लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेताना दुआ पठणानंतर शाहरुख खान थुंकला असं म्हटलं जात आहे, पण शाहरुखनं खरंच असं काही केलंय का? या घटनेनंतर लोकांनी शाहरुख खानला प्रचंड प्रमाणात ट्रोल केले आहे.  शाहरुख खान आणि त्याच्या मॅनेजर पूजा ददलानी यांनी देखील लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेतले.


नेमकं शाहरुखने काय केले ज्याने तो एवढा ट्रोल होतोय 


शाहरुखने आधी लता मंगेशकर यांच्यासाठी दुआ मागितली. यानंतर मास्क खाली करुन तो काहीतरी करताना दिसला. त्यानंतर दोन्ही हात जोडून लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला प्रदक्षिणा घातली. या संपूर्ण प्रकरणावरुन सोशल मीडियात एका नवा वाद सुरु आहे. शाहरुख खाननं दुवा मागितल्यानंतर मास्क खाली करुन केलेली कृती ही थुंकण्याचा प्रकार होता, असा आरोप अनेक लोक सध्या करत आहेत. तर काही लोक त्याच्या समर्थनार्थ देखील उतरले आहेत. 


गंगा-जमुना संस्कृती म्हणजे काय? 
अभ्यासक असं सांगतात की, गंगा-जमुना संस्कृती हिंदू-मुस्लिम धर्माचे सौंदर्य आणि मैत्रीची तुलना भारतातील प्रमुख नद्यांशी म्हणजेच गंगा आणि यमुना यांच्या पवित्र संगमाशी करतात. बनारसमधील हिंदू आणि मुस्लिम संस्कृती आणि जीवनशैलीचे शांततापूर्ण विलीनीकरण हे त्यांच्या मैत्रीचे प्रतीक मानले जाते. अशा प्रकारे, गंगा-जमुनी तहजीब लोकांना ते धार्मिक समुदायांमध्ये सामायिक केलेल्या अतुलनीय ऐक्याची आठवण करून देतात. हे रुपक बौद्धिक आणि धार्मिक प्रवचनात विशेषतः लोकप्रिय आहे.  


खरंच शाहरुख थुंकलाय का?
खरं तर, फुंकणे आणि थुंकणे यात खूप फरक असतो, हे आता तुमच्या लक्षात आले असेल. पण, यात थुंकताना किंवा फुंकताना आपल्या ओठांची हालचाल जवळजवळ सारखी असते, त्यामुळे अनेकांचा गैरसमज झाला आहे. ही गोष्ट अनेकांनी समजून न घेता लोकांनी  टीका सुरू केली आहे. थुंकणे आणि फुंकणे यातील फरक आपण जाणतो. शाहरुखने केलेल्या कृतीला ‘फुंकणे’ किंवा ‘फातिहा पढणं’असं म्हणतात. आपण याला त्याने त्याच्या पद्धतीने आदरांजली वाहिली, असे ही म्हणू शकतो. फतिहा पूर्ण होण्यासाठी शेवटी एक फुंकर मारावी लागते.


VIDEO : शाहरुखनं नेमकं केलं काय? व्हिडीओ पाहा




महत्त्वाच्या बातम्या: