Pooja Dadlani : भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आता आपल्यात नाहीत. रविवारी (7 फेब्रुवारी) त्यांच्यावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जावेद अख्तर, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, शंकर महादेवन यांसारखे दिग्गज लता मंगेशकरांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आले होते. लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात शाहरुख खान दुआ पठण करताना दिसतो.


यादरम्यान शाहरुख खानने (Shah Rukh Khan) लताजींच्या पायाला स्पर्श करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्यासाठी प्रार्थना देखील केली. यावेळी शाहरुखसोबत एक महिलाही दिसली. शाहरुखसोबत उपस्थित असलेली ही महिला गौरी खान आहे, असे बऱ्याच लोकांना वाटले. मात्र, शाहरुखसोबत दिसलेली ती व्यक्ती गौरी नव्हती. शाहरुखसोबतच्या या व्हायरल फोटोमध्ये त्याची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) आहे.


लतादीदींना वाहिली श्रद्धांजली


बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्यांची मॅनेजर पूजा ददलानी दोघेही लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी स्टेजवर एकत्र चढले होते. एकीकडे तिची मॅनेजर पूजा ददलानी हात जोडून देवाचे स्मरण करताना दिसली, तर शाहरुख खान देखील दुआ पठण केली. हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.


हा फोटो पाहून काही यूजर्स प्रश्न विचारत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘मी या महिलेला ओळखू शकत नाही, ती गौरी आहे का?’ त्याच वेळी, एकाने लिहिले, ‘हा नवा भारत नाही, हा खरा भारत आहे.’ लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारात शाहरुख खान फातिहा वाचताना दिसला होता.


दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा


गेल्या महिन्यात 9 जानेवारीला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी 8 वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यसंस्कारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही शिवाजी पार्कवर पोहोचले. लताजींच्या निधनाबद्दल दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार असून, देशभरात राष्ट्रध्वज अर्ध्यावर राहील.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha