Lata Mangeshkar : स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने देशभरात शोक व्यक्त होत आहे. लतादीदींच्या निधनाने संगीतप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून लतादीदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. अशावेळी पु.ल. देशपांडे यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांनी लता मंगेशकर यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले होते.  


पु. ल. देशपांडे यांनी केलेले भाषण हे 1989 मध्ये जागतिक मराठी परिषेदेत हे भाषण केले असावे असे म्हटले जात आहे. या परिषदेत कला, साहित्य, राजकारण, उद्योग, समाजकारण अशा विविध क्षेत्रातील मंडळींची
या परिषदेला उपस्थितीत होती. यावेळी पु.ल. देशपांडे यांनी भाषण केले होते. काही महिन्यांपूर्वी हे भाषण व्हायरल झाले होते. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता हे भाषण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पु.ल. देशपांडे यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांची ओळख करून देताना लता मंगेशकर यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले


पु.ल. देशपांडे काय म्हटले होते?
 
पु. ल. देशपांडे म्हणाले होते. ‘मला जर एखाद्यांने विचारलं की, आकाशात देव आहे का?, तर मी सांगेन देव आहे की नाही मला माहीत नाही. मात्र ह्या आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे. दिवस रात्र अशी कुठलीही वेळ नाही, क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठे जात असतो.' पु. ल. देशपांडे यांनी काढलेल्या कौतुकोद्गाराला उपस्थित असलेल्या मान्यवरांसह जमलेल्या उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट दाद दिली. 






 


गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जाण्याने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सर्वजण आज त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात तशी 1942 मध्ये झाली. पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं. मात्र त्या आधी 1938 साली त्यांनी सोलापुरात पहिल्यांदा गायन केलं होतं.