Lata Mangeshkar Memorial:  गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  काल त्यांच्यावर शिवाजी पार्कवर (Shivaji Park) अंत्यसंस्कार करण्यात आले. आता भाजपकडून लतादीदींचं स्मारक शिवाजी पार्कवर करावं अशी मागणी केली जात आहे. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. शिवाजी पार्कवरच लतादीदींचं स्मृतीस्थळ बनवण्याची मागणी राम कदमांनी केली आहे. 






राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ज्या ठिकाणी लतादीदी पंचतत्वात विलीन झाल्या त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक बनवावं. जनतेच्या या मागणीची तत्काळ पूर्तता करावी. हे स्थळ जगासाठी एक प्रेरणास्थळ ठरेल, असं राम कदमांनी म्हटलं आहे. 


मागणीची गरज नाही, यावर राजकारण करू नका- संजय राऊत


यावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आहे की, लता दीदींनी कधीही विसरता येणार नाही. काहींनी पार्कात स्मारक बनवण्याची मागणी केलीय. मात्र मागणीची गरज नाही, यावर राजकारण करू नका. लता दिदींच्या स्मारकाबाबत देशानं विचार करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. 


राऊत म्हणाले की, महिन्याभरापूर्वी लतादीदींचा मला फोन आला होता.  मी अटलजींवर बोलत होतो, ते त्यांनी ऐकलं. अटलजी आमचे दद्दा होते असं त्या मला म्हणाल्या. शाहरुखवर होत असलेल्या टिकेवर बोलताना ते म्हणाले की, शाहरूखच्या कृतीवर उगाच ट्रोल केलं जातंय, एका गटाचे एका परिवाराचे लोकं हे काम करतायत.  हा नालायकपणा आहे, तुम्हाला बाकी काही उद्योग नाहीत. हे लोक देशाची वाट लावतायत असं ते म्हणाले. 


संबंधित इतर बातम्या


 Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


Lata Mangeshkar : 20 भाषांमध्ये तब्बल 30 हजारांहून अधिक गाणी, लता मंगेशकरांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम!


Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट