Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या अपकमिंग चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच त्याचे पठाण, जवान आणि डंकी हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच शाहरुखला त्याच्या फॅमिलीसोबत मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी शाहरुखसोबत आर्यन (Aryan Khan) आणि अबराम ही त्याची मुलं देखील होती. मुंबई विमानतळावर शाहरुख येताच एका चाहत्याला त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. पण शाहरुख मात्र या त्याच्या फॅनवर वैतागलेला दिसला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की शाहरुख, अबराम आणि आर्यन हे मुंबई एअरपोर्टवरुन बाहेर पडत असतानाच शाहरुखचा एक चाहता सेल्फी काढण्यासाठी शाहरुखच्या जवळ येतो. हा चाहता शाहरुखचा हात धरुन त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. यावेळी शाहरुख त्या चाहत्याला पाहून वैतागतो. हे पाहताच आर्यन शाहरुखच्या जवळ येऊन शाहरुखला शांत करण्याचा प्रयत्न करतो.
पाहा व्हिडीओ:
व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुखला आर्यन ज्या पद्धतीनं शांत करतो, ते पाहून अनेकांनी आर्यनचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओमधून शाहरुख आणि आर्यनमधील बाँडिंग दिसत आहे. 2 जून 2023 रोजी शाहरुखचा 'जवान' चित्रपट रिलीज होणार आहे. तर शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर शाहरुखचा ‘डंकी’ हा चित्रपट डिसेंबर 2023 मध्ये रिलीज होणार आहे. ‘डंकी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं आहे.
वाचा इतर बातम्या:
- Srk Jawan Teaser : 'जवान'चा टीझर पाहून शाहरुखच्या चाहत्यांनी सिनेमागृहात वाजवल्या शिट्ट्या; व्हिडीओ व्हायरल
- Dunki : ‘डंकी’च्या चित्रीकरणासाठी ‘किंग’ शाहरुख खान लंडनमध्ये! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल