Shah Rukh Khan Jawan Teaser : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या 'जवान' (Jawan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'एक विलन रिटर्न्स' (Ek Villain Returns) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमादरम्यान शाहरुखच्या 'जवान'चा टीझर दाखवण्यात आला. 'जवान' सिनेमाची शाहरुखच्या चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 'जवान'चा टीझर पाहून शाहरुखच्या चाहत्यांनी सिनेमागृहात वाजवल्या शिट्ट्या वाजवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


किंग खानच्या चाहत्यांमध्ये 'जवान'ची क्रेझ


शाहरुखचे चाहते त्याच्या सिनेमांची आतुरतेने वाट पाहत असतात. शाहरुख 'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून अनेक दिवसांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. सध्या शाहरुखच्या आगामी 'जवान' सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. हा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 'जवान'चा टीझर सिनेमागृहात दाखवला गेला तेव्हा चाहत्यांनी शिट्ट्या वाजवत आनंद व्यक्त केला. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ महाराष्ट्रातील मालेगावमधील मोहन सिनेमागृहातील आहे. 






2 जूनला सिनेमा होणार प्रदर्शित


शाहरुख खानचा बहुचर्चित 'जवान' हा सिनेमा 2 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किंग खानसोबत या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारादेखील (Nayanthara) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 


जवानच्या टीझरला मिळाली प्रेक्षकांची पसंती


सोशल मीडियवर शाहरुखनं जवान चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. टीझर शेअर करुन शाहरुखने कॅप्शनमध्ये लिहिले होते, “2023 असणार अॅक्शन पॅक! 2 जून 2023 रोजी तुमचे मनोरंजन करण्यासाठी 'जवान' चित्रपट रिलीज होतो.' एक मिनिट 30 सेकंदाच्या या टीझरमध्ये शाहरुख डोक्यावर आणि हातावर पट्टी बांधलेली दिसत आहे. तसेच हातात मशीन गन धरुन एका गुप्त ठिकाणी शाहरुख बसलेला दिसत आहे. त्याचा हा लूक त्याचे चाहते थक्क झाले आहेत. 


संबंधित बातम्या


Jawan : शाहरुखच्या जवानमध्ये विजय सेतुपतीची एन्ट्री; या साऊथ अभिनेत्याला केलं रिप्लेस


Shahrukh Khan Pune Metro: शाहरुख खानच्या जवान चित्रपटात झळकणार 'पुणे मेट्रो'