एक्स्प्लोर

Savalyachi Vari: 'सावळ्याची वारी'मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर; श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं भक्तिगीत

Savalyachi Vari: आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदर्शित झालेलं 'सावळ्याची वारी' हे भक्तिगीत प्रत्येक विठ्ठलभक्ताला भक्तिरसात रंगवणारं ठरत आहे.

Savalyachi Vari: वारी सोहळ्याचं भक्तिमय वातावरण, विठ्ठल नामाचा अखंड गजर आणि वारकऱ्यांच्या अढळ श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं 'सावळ्याची वारी' हे नवीन भक्तिगीत नुकतंच प्रदर्शित झालं आहे. सुरेल संगीत, अर्थपूर्ण शब्द आणि वारीच्या परंपरेचं जिवंत चित्रण यामुळे हे गीत रसिकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.

या भक्तिगीताला संगीतकार प्रफुल्ल प्रकाश यांनी संगीतबद्ध केलं असून, त्यांनीच आपल्या दमदार आणि भावपूर्ण आवाजात हे गीत साकारलं आहे. विठ्ठलभक्तीचा उत्साह, वारकऱ्यांचा आनंद आणि पालखी सोहळ्याचं दिव्य वातावरण संगीताच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या गीतातून करण्यात आला आहे.

या गाण्याचे बोल कृष्णा वाळके यांनी शब्दबद्ध केले असून, वारीची परंपरा, भक्ती आणि विठ्ठलप्रेम यांचं सुंदर दर्शन त्यांच्या लेखणीतून घडतं. तर सागर वाळके यांनी या गाण्याचं संकलन केलं असून, गीताची दृश्यात्मक मांडणीही आकर्षक पद्धतीने करण्यात आली आहे.

आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदर्शित झालेलं 'सावळ्याची वारी' हे भक्तिगीत प्रत्येक विठ्ठलभक्ताला भक्तिरसात रंगवणारं ठरत आहे. टाळ-मृदंगाचा निनाद, वारकऱ्यांचा उत्साह आणि विठ्ठलनामाचा गजर यामुळे हे गाणं वारीचा आध्यात्मिक अनुभव घरबसल्या देतं.

या गाण्याबद्दल गीतकार कृष्णा वाळके म्हणाले, "सावळ्याची वारी' हे गीत साकारताना वारीचा भक्तिमय उत्साह आणि विठ्ठलभक्तीचा भाव प्रत्येक सुरातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. हे गीत प्रत्येक विठ्ठलभक्ताच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल, असा विश्वास आहे,  वारी ही केवळ यात्रा नाही, तर श्रद्धा, समर्पण आणि भक्तीचा अखंड उत्सव आहे. त्या भावनेला शब्दांत मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न या गीतातून केला आहे. रसिकांना हे गीत नक्कीच आवडेल, अशी आशा आहे."

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Savalyachi Vari: 'सावळ्याची वारी'मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर; श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं भक्तिगीत
'सावळ्याची वारी'मधून विठ्ठलभक्तीचा सुरेल गजर; श्रद्धेचा भावस्पर्शी अनुभव देणारं भक्तिगीत
Friday Relese: या विकेंडला काय पहाताय? OTTसह थिएटरमध्ये एकाच दिवशी हे धमाकेदार चित्रपट- वेबसीरिज रिलीज, वाचा लिस्ट
या विकेंडला काय पहाताय? OTTसह थिएटरमध्ये एकाच दिवशी हे धमाकेदार चित्रपट- वेबसीरिज रिलीज, वाचा लिस्ट
Jana Nayagan Movie Review: तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय आणि भारताची लोकशाही साजरी करणारी फिल्म
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय आणि भारताची लोकशाही साजरी करणारी फिल्म
Atharva Sudame on Subodh Bhave: सुबोध भावेंचा न पाहिलेला अवतार, श्री गोंदवलेकर महाराजांची भूमिका चर्चेत; अथर्व सुदामेची शॉर्ट फिल्म कधी होणार रिलीज?
सुबोध भावेंचा न पाहिलेला अवतार, श्री गोंदवलेकर महाराजांची भूमिका चर्चेत; अथर्व सुदामेची शॉर्ट फिल्म कधी होणार रिलीज?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊल लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊल लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Embed widget