Nargis Death Anniversary : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस  (Nargis) यांचा आज स्मृतीदिन. 3 मे 1981 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  1942 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमन्ना या चित्रपटामधून नर्गिस यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.  नर्गिस यांच्या 'अंदाज', 'आग', 'बरसात', 'श्री 420', 'चोरी चोरी', 'मदर इंडिया'  या  चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  नुकतेच अभिनेता संजय दत्तनं (Sanjay Dutt) नर्गिस यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या फोटोला संजयनं खास कॅप्शन देखील दिलं आहे. 

  
संजय दत्तची पोस्ट
संजयनं त्याच्या आईचे म्हणजेच नर्गिस यांचे काही फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं, 'असा एकही क्षण गेला नाही जेव्हा मला तुझी आठवण आली नसेल. तु माझ्या आयुष्याचा पाया आहेस. तसेच तु माझी शक्ती देखील आहेस.  जर तु माझ्या मुलांना आणि पत्नीला भेटली असतीस तर त्यांना देखील तुझा आशीर्वाद आणि प्रेम मिळालं असतं. मी तुला आज मिस करत आहे. मला तुझी रोज आठवण येते. '






अनेक नेटकऱ्यांनी संजय दत्तच्या पोस्टवर कमेंट केली. एका नेटकऱ्यानं संजयच्या पोस्टाला 'लेजेंड'अशी कमेंट केली आहे. संजयच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या संजू या चित्रपटामध्ये देखील नर्गिस आणि संजय यांच्यामधील बाँडिंग दिसते. काही दिवसांपूर्वी संजयचा केजीएफ-2 हा चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  


संबंधित बातम्या