Drug Smuggling :  अमेरिकेतून कुरियरमधून मुंबईत ड्रग्सची तस्करी करणाऱ्या काही आरोपींना नुकतेच अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तब्बल 27 किलो मारीजुआणा ड्रग्स जप्त करण्यात आला आहे. तर गुरजातमध्येही गेल्या काही दिवसांमध्ये ड्रग्सची तस्करी करणाऱ्या काहींना अकट करण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर सीमेपलीकडून पाकिस्तानमधून भारतात अंमली पदार्थ पाठवले जात असल्याचे तपासातून समोर आले आहे. पंजाबमधील अबोहर सेक्टरमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील सीमा सुरक्षा दलाने प्लास्टिकच्या दोन बाटल्यांमधील हेरॉइन जप्त केले आहे. त्यामुळे ड्रग्स तस्करीच्या सतत होणाऱ्या या घटांमुळे सीमेवरील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. 


बीएसएफ (BSF) च्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडून अंमली पदार्थ भारतात पाठवले जात असल्याचे समोर आल्यामुळे सीमेरील सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. पंजाबमधील अबोहर सेक्टर अंतर्गत येत असलेल्या जोधावाला गावाच्या जवळील सीमेजवळ भारतीय हद्दीत एक संशयित व्यक्ती बीएसएफच्या जवानांना संशयितरित्या दिसून आली. जवानांनी त्या व्यक्तीला बोलवले त्यावेळी तो आपल्या दुचारीवरून पळून गेला. 


 संशयित पळून गेल्यानंतर बीएसएफच्या जवानांनी सीमेच्या जवळील भागात तपासणी केली. यावेळी जवानांना प्लास्टिकच्या दोन बाटल्या सापडल्या. या बाटल्या हिरव्या रंगाच्या कापडामध्ये बांधण्यात आल्या होत्या. जवानांनी या बाटल्या ताब्यात घेऊन त्यामध्ये काय आहे याची तपासणी केली, यावेळी त्या बाटल्यांमध्ये हेरॉइन असल्याचे आढळून आले. पोलिसांनी हे हेरॉइन जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. 


बीएसएफच्या जवानांचे हे म्हणणे आहे की, जप्त केलेले हेरॉइन हे सीमेपलिकडून भारताच्या हद्दीत टाकण्यात आले होते. भारताच्या हद्दीतील ड्रग्स तस्कराला सीमेपलीकडून हे हेरॉइम भारतात येणार असल्याची माहिती होती. त्यामुळेच पळून गेलेला संशयित हे हेरॉइन नेहण्यासाठी तेथे आला होता. परंतु. जवानांना पाहून त्याने तेथून पळ काढला. दरम्यान, भारतीय सीमा सुरक्षा दलाने गेल्या काही दिवसांपूर्वीच भारत-पाकिस्तान सीमेवर शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्याकडून अमली पदार्थ जप्त केले होते.


महत्वाच्या बातम्या


Crime News : मुंबई कस्टमची मोठी कारवाई; अमेरिकेतून कुरियरमधून मुंबईत ड्रग्सची तस्करी, 27 किलो ड्रग्स जप्त


उपराजधानी हादरली! तरुणींच्या मदतीनं ओडिशामधून होणाऱ्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात पोलिसांचाही हात