Panchayat Season 2 :  पंचायत (Panchayat) या कॉमेडी ड्रामा वेबसीरीजमध्ये  जितेंद्र कुमार (Jitendra Kumar), रघुवीर यादव  आणि नीना गुप्ता यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या सीरिजचं दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केलं आहे.  या सीरिजमध्ये अभिषेक मिश्रा या मुलाची गोष्ट दाखवण्यात आली. आता लवकरच या सीरिजचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 


पंचायत सीरिच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या सीरिजमधील कलाकारांचा अभिनय आणि सीरिजचे कथानक या गोष्टींनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. या सीरिजचा दुसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'पंचायत 2' (Panchayat Season 2) हा सिझन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. पंचायत सीरिजच्या पहिल्या भागातील प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता जितेंद्र कुमारनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं पंचायत न्यू सिझन असं लिहिलेलं दिसत आहे. त्यावर 20 मे ही तारीख देखील दिसत आहे. जितेंद्रनं या पोस्टरला कॅप्शन दिलं, 'गाव चले', असं लिहिलेलं दिसत आहे. जितेंद्र या पोस्टवरून असं लक्षात येतं की पंचायत सीरिजचा दुसरा सीझन हा 20 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 





जितेंद्र कुमारच्या कोटा फॅक्ट्री या सीरिजला आणि चमन बहार या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच आयुष्मान खुराणाच्या शुभ मंगल ज्यादा सावधान या चित्रपटामध्ये देखील जितेंद्रनं प्रमुख भूमिका साकारली. 


संबंधित बातम्या