Harshada Garud won gold medal : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने यंदा घवघवीत यश मिळवलं. यावेळी सर्वात पहिलं पदक मिळवून दिलं ते मीराबाई चानू हिने तेही वेटलिफ्टिंग या खेळात. दरम्यान याच खेळात आता पुण्याच्या हर्षदा गरुड (Harshada Garud) हिने जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत (World Junior Weightlifting Championship) सुवर्णपदक पटकावलं आहे. हर्षदाच्या या सुवर्णकामगिरीवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी देखील हर्षदा गरुड हिचे अभिनंदन केले आहे. 


हर्षधा ही पुणे जिल्ह्यातील मावळ या ठिकाणची रहिवाशी असून ती बालपणापासून क्रिडाक्षेत्रात सक्रिय आहे. वेटलिफ्टिंग या दमदार खेळात तिला आधीपासून रस असल्याने त्याबाबतचे प्रशिक्षणही तिने घेतले आहे. त्यानंतर आता हर्षदाने ग्रीस- हेराकिलॉन येथील या जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतासाठी पहिलं वहिलं सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे.


भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा


हर्षदाने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत केलेल्या सुवर्णकामगिरीमुळे अवघ्या देशाला तिचा अभिमान वाटत आहे. कारण या स्पर्धेत भारताने यापूर्वी कधीच अशाप्रकारे सुवर्णपदक जिंकले नव्हते. त्यामुळे हर्षदाने महाराष्ट्राच्याच नाही तर अवघ्या भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. दरम्यान हर्षदाचा हा पराक्रम सर्वांसाठी अभिमानास्पद आणि अनेकांना प्रेरणादायी असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हर्षदाचं अभिनंदन करत तिला भविष्यातील अशाच सुवर्णकामगिरीसासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 


हे देखील वाचा-