Nawazuddin Siddiqui : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. त्याचा हिरोपंती-2 (heropanti 2) हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटामधील त्याच्या कॅरेक्टरबाबत सध्या चर्चा सुरू आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि  तारा सुतारिया (Tara Sutaria) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच अहमद खान (Ahmed Khan) यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गँग ऑफ वासेपूर, मंटो या चित्रपटांना आणि सेक्रेड गेम्स  या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नवाजुद्दीननं अनेक चित्रपटांसाठी कोट्यवधींचे मानधन घेतलं आहे. पण एका चित्रपटासाठी मात्र नवाजुद्दीननं केवळ एक रूपया मानधन घेतलं. 
 
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या मंटो या चित्रपटासाठी नवाजुद्दीननं एक रूपया मानधन घेतलं. हा चित्रपट लेखक सआदत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित आहे. नवाजुद्दीननं या चित्रपटामध्ये मंटो यांची भूमिका साकारली. जेव्हा नवाजुद्दीननं या चित्रपटाचं कथानक ऐकलं तेव्हा हा चित्रपटासाठी मानधन न घेण्याचा नवाजुद्दीननं निर्णय घेतला होता. मंटो ही भूमिका नवाजुद्दीनला जवळची वाटली. त्यामुळे त्यानं केवळ एक रूपया मानधन घेऊन या चित्रपटामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. 


नवाझुद्दीन सिद्दीकीचा मुंबईत नवा बंगला
काही दिवासांपूर्वीच मुंबईतील नवाझुद्दीनच्या घराचं काम पूर्ण झालं आहे. नवाझुद्दीनने या घराचं नाव त्याच्या वडिलांच्या आठवणीत 'नवाब' असं ठेवलं आहे. नवाझुद्दीननं त्याच्या या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 


संबंधित बातम्या