Samantha : नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतर समंथा 'या' व्यक्तीला म्हणाली स्पेशल ; पोस्ट शेअर
Samantha : समंथा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
![Samantha : नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतर समंथा 'या' व्यक्तीला म्हणाली स्पेशल ; पोस्ट शेअर samantha share special person photo on social media Samantha : नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतर समंथा 'या' व्यक्तीला म्हणाली स्पेशल ; पोस्ट शेअर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/23/5df64455fdd655c113f7748e3e584bc6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Samantha : अभिनेत्री समंथा (Samantha) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी काही दिवसांपूर्वी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांना घटस्फोटाबद्दल माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी वेगळं होण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले होते. समंथा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिनं नुकतीच एक फोटो शेअर केली आहे. या फोटोमध्ये समंथा तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसोबत पोज देताना दिसत आहे.
समंथानं शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री नयनतारा दिसत आहे. समंथानं फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, '22 फेब्रुवारी 2022 आमची 'स्पेशल' मैत्री. ती सोशल मीडियावर नाहिये. पण ती सर्वांवर प्रेम करते. '
View this post on Instagram
6 ऑक्टोबर 2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले. गेल्या वर्षी समंथा आणि नाग चैतन्य यांचा त्यांचा घटस्फोट झाला. समंथाने नुकताच तिच्या 'शकुंतलम' या आगामी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरला समंथाच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे.
संबंधित बातम्या
- Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांचा नवा अवतार, शिव तांडव स्त्रोतम 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Samantha : फिटनेस फ्रिक समंथा करत होती 'या' आजाराचा सामना; सोडावा लागला होता चित्रपट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)