Salman Khan on Arbaaz Khan Second Wedding : 'तो कोणाचे ऐकत नाही', अरबाज खानच्या दुसऱ्या विवाहाबाबत सलमानने व्यक्त केली प्रतिक्रिया
Salman Khan on Arbaaz Khan Second Wedding : दरम्यान, सलमानने अरबाज खानच्या (Arbaaz Khan) दुसऱ्या विवाहाबाबत प्रतिक्रिया व्यक्त दिली आहे. काही दिवसांपूर्वीच अरबाजने शूरा खान हिच्याशी दुसरा विवाह केला होता.
Salman Khan on Arbaaz Khan Second Wedding : अभिनेता सलमान खानने (Salman Khan) बिग बॉस सिझन 17 (Bigg Boss 17) च्या विजेत्याची घोषणा केली आहे. कॉमेडियन मुन्नवर फारुकी हा बिग बॉस सिझन 17 चा विजेता ठरलाय. दरम्यान, सलमानने अरबाज खानच्या (Arbaaz Khan) दुसऱ्या विवाहाबाबत प्रतिक्रिया व्यक्त दिली आहे. काही दिवसांपूर्वीच अरबाजने शूरा खान हिच्याशी दुसरा विवाह केला होता. अभिनेत्री मलायका अरोरा हिच्याशी अरबाजने पहिला विवाह केला होत. त्यानंतर दोघे वेगळे झाले होते.
बिग बॉस 17 मध्ये भारती सिंगने (Bharti Singh)सलमानला अरबाजच्या विवाहाबाबत सवाल केले. भारतीच्या सर्व प्रश्नांची सलमान खानने उत्तर दिली आहेत. बिग बॉस 17 च्या महाअंतिम सोहळ्यात सलमान अरबाज आणि सोहेल या दोन्ही भावांसोबत दिसला. महाअंतिम सोहळा तिघांनी एकत्रितपणे सेलिब्रेट केला. या शोमध्ये अरबाजची दुसरी पत्नी शूरा देखील सामील झाली होती.
तुमच्या लग्नाला बोलावले नाही?
भारती सिंगने स्टेजवर उपस्थित असलेल्या अरबाज खानला विनोदाने विचारले की, तुमच्या लग्नाला आम्हाला का बोलावले नाही? भारतीच्या या प्रश्नावर अरबाजने देखील प्रत्युत्तर दिले आहे. अरबाज म्हणाला, "जाऊदे, पुढच्या वेळी नक्की बोलावेल, मात्र दुसऱ्या कोणाच्या तर विवाहाला"
अरबाजच्या दुसऱ्या विवाहाबाबत सलमान काय म्हणाला?
अभिनेता अरबाज खानने दिलेल्या उत्तरानंतर भारती चांगलीच हैराण झाली. त्यानंतर तिने सलमान खानला सवाल केले. भारतीने सलमानला विचारले की, "तुम्ही अरबाज खानला दुसऱ्या विवाहाबाबत काही सल्ला दिला नाही का?" भारतीच्या या प्रश्नाचे उत्तर देताना अरबाज म्हणाला, "अरबाज कोणाचे ऐकत नाही. जर ऐकले असते तर" इतक्यावर भारती सिंग थांबत नाही. यानंतर ती सोहेल खानकडे जाते आणि त्याच्या फॅशन सेन्सची टिंगल करते.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या