Salman Khan Koffee With Karan: पैसा, बंगला, प्रसिद्धी सगळं मिळवलं, पण...; सलमान खानला आजही जाणवतेय एका गोष्टीची उणीव, लग्न न करता त्याला...
Salman Khan on Koffee With Karan 9: सलमान खानने 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावून विविध गोष्टींचा खुलासा केला.

Salman Khan on Children: सलमान खान (Salman Khan) बऱ्याचदा ट्रेंडिंगवर असतो. बातम्यांच्या हेडलाइनमध्ये असतो. सलमान खान प्रोफेशनलसह आपल्या वैयक्तिक आयु्ष्यामुळे (Personal Life) चर्चेत असतो. सलमान खानचं पर्सनल आयुष्य एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. आज त्याच्याकडे घर, गाडी, पैसा सगळं काही त्याने स्वत:च्या हिंमतीवर उभं केलं. एवढं सगळं काही असूनही त्याच्या आयुष्यात एक पोकळी आहे. सलमान खानने बऱ्याचदा वडील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता असं म्हटलं जात आहे की, त्याने करण जोहरच्या शोमध्येही मुलाचा उल्लेख केलेला आहे. 'कॉफी विथ करण'च्या (Koffee With Karan) नवव्या सिझनमध्ये सलमान खानने हजेरी लावली. याचा प्रोमोही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यावेळी त्याला पुन्हा एकदा, 'अजूनही व्हर्जिन आहेस का?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने भन्नाट उत्तर दिलं.
लग्न नाही पण सलमान खानला व्हायचंय बाबा (Salman Khan Opens Up About Having Children on Karan Johars Show)
सलमान खानने नुकतंच 'कॉफी विथ करण' च्या नवव्या सिझनमध्ये हजेरी लावली. हा सिझन त्याचा शेवटचा सिझन असल्याचं म्हटलं जात आहे. या शोमध्ये सलमान खान पाहुणा म्हणून येणार आहे. या शोचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. या शोमध्ये सलमान खान आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे पोकळी आहे, याबाबत बोलणार आहे. व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये सुरुवातीला सलमान खानचा ब्रेसलेट दिसत आहे. या कार्यक्रमात त्याने पाहुणा म्हणून हजेरी लावली. या शोमध्ये सलमान आपल्याला मुले नसल्याबद्दलच्या खंतविषयी बोलला आहे.
करण जोहरने सलमान खानला विचारले की, 'त्याला स्वतःचे मूल नसल्याची उणीव भासते का?'. 'व्हरायटी इंडिया'नुसार, सलमानने या गोष्टीला दुजोरा दिला आणि भविष्यात आपल्याला स्वतःचे मूल असावे, अशी इच्छा व्यक्त केली. 'व्हरायटी इंडिया'च्या रिपोर्टनुसार, सलमानने मुल नसल्याच्या गोष्टीला दुजोरा दिला. तसेच भविष्यात आपल्याला स्वतःचे मूल असावे, अशी इच्छाही व्यक्त केली. रिपोर्ट्सनुसार, सलमान खान बऱ्याच काळापासून गायिका अन् अभिनेत्री लूलिया वंतूरला डेट करत आहे. 2015 साली दोघांनाही एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्या नात्याची प्रचंड चर्चा झाली. यानंतर लूलिया सलमान खानसोबत फॅमिली फंक्शनमध्ये एकत्र दिसू लागली.
सलमान खानचं वैयक्तिक आयुष्य प्रचंड चर्चेत राहिलं आहे. त्याचे संगीता बिजलानी, कतरिना कैफ आणि ऐश्वर्या राय यांच्याशी जवळचे संबंध राहिले आहेत. अनेक अभिनेत्रींशी प्रेमसंबंध असूनही सलमान खान अजूनही सिंगल आहे. केवळ 'कॉफी विथ करण'मध्येच नाही, त्याने यापूर्वीही विविध मुलाखतींमध्ये वडील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याला लग्न करायचे नाही, पण त्याला मुल हवं आहे, असं तो म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























