Salman Khan: शेतात राबले, चिखलाने माखले; सलमान-धोनीचा याराना, बर्थ डेच्या आधीच लाडक्या मेहुण्याकडून PHOTO शेअर
Salman Khan Poses with MS Dhoni and AP Dhillon at Panvel Farmhouse: वाढदिवसाआधी सलमान - धोनी - एपी ढिल्लन या तिघांचा जुना फोटो व्हायरल. पनवेल फार्महाऊसवरील हा फोटो अतुल अग्निहोत्री यांनी शेअर केला.

Salman Khan Poses with MS Dhoni and AP Dhillon at Panvel Farmhouse: अभिनेता सलमान खानचे (Salman Khan) चाहते 27 डिसेंबरची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण या दिवशी सलमान 60 वर्षांचा होणार आहे. याच दिवशी त्याच्या आगामी चित्रपटाबाबत मोठी अपडेट अपेक्षित आहे. पुढील वर्षात सलमानचा बॅटल ऑफ गलवान चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील सलमानचा पहिला लूक आधीच समोर आला आहे. 27 डिसेंबरला या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होईल, अशी चर्चा आहे. याच चर्चेदरम्यान सलमानच्या एका फोटोमुळे सोशल मीडियात चर्चेला उधाण आलं आहे. या फोटोमध्ये सलमानसोबत महेंद्रसिंह धोनी आणि गायक एपी ढिल्लन दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
अलिकडेच, अतुल अग्निहोत्रीने सलमान खान, क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनी आणि गायक एपी ढिल्लन यांचा एक जबरदस्त जुना फोटो शेअर केला आहे. हे तिघेही मुंबईतील पनवेल येथील फार्महाऊसवर असल्याचं दिसत आहे. हा फोटो जुना जरी असला तरी, तिघांमधील ही मैत्री नेमकी कधीपासून आहे? यावर चाहत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
अतुल अग्निहोत्री हे एक चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. तसेच सलमान खानचे मेहुणे देखील आहे. त्यांनी सलमान खानच्या बहिणीशी विवाह केला होता. व्हायरल फोटोमध्ये फार्महाऊस दिसत आहे. सलमान खान, महेंद्रसिंह धोनी आणि एपी ढिल्लन दिसत आहे. तिघांच्या मागे एक ट्रॅक्टर दिसत आहे. शेतात राबल्यामुळे तिघेही चिखलाने माखलेले दिसत आहे. तर, दुसऱ्या एका फोटोमध्ये सलमान खान आणि महेंद्र सिंह धोनी शेतात राबताना दिसत आहेत.
Throwback & unseen moment 🫶❤️
— BBTak (@BiggBoss_Tak) December 24, 2025
Old picture featuring MS Dhoni with AP Dhillon and Salman bhai.
Icons in one frame ✨ pic.twitter.com/f84ZIuaUxc
सलमान खानच्या वाढदिवसाच्या अगदी काही दिवसाआधीच अतुल अग्निहोत्री याने हा फोटो शेअर केला आहे. या व्हायरल फोटोमुळे सलमान खान आणि महेंद्र सिंह धोनी यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, याआधी सलमान खानने महेंद्रसिंह धोनीच्या 43 व्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. सलमानने धोनी खास सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छाही दिल्या. "वाढदिवसाच्या शुभेच्छा कप्तान साहेब". ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
धुरंधरच्या दुसऱ्या भागात नवे चेहरे? अक्षय खन्नासह 5 कलाकारांचा पत्ता कट, चित्रपट कधी येणार?























