कधी भेळ बनवली, तर कधी तुफान मस्ती; सलमान खानच्या Birthdayला कोण-कोण आलं? फार्महाऊसमधील इनसाइड फोटो व्हायरल
Salman Khans Birthday Party Photos Go Viral: सलमान खानने कुटुंबीय आणि मित्रांसोबत 60 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी राम चरण आणि सलमान खान यांची खास मैत्री फोटोंमधून दिसून आली.

Salman Khans Birthday Party: 27 डिसेंबर 2025 रोजी सलमान खान (Salman Khan) 60 वर्षांचा झाला. त्याने आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवारासह वाढदिवस साजरा केला. भाईजानच्या बर्थ़डे पार्टीमध्ये अनेक कलाकारांना आमंत्रण होतं. या पार्टीतील अनेक इनसाइड फोटो समोर येत आहेत. या पार्टीमध्ये अनेक दिग्गज कलाकार दिसत आहेत. व्हायरल फोटोंमधून असे दिसते की, सलमानने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत खूप मजा केली. तसेच सर्वांसोबत फोटो काढले. दरम्यान रितेश देशमुख याने देखील काही बर्थ डेचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये साऊथ सुपरस्टार राम चरण सलमानसोबत आनंदाने पोज देताना दिसत आहे. रितेशने फोटो शेअर करून एक गोड कॅप्शन देखील दिलं आहे.
भाईजानचे बर्थ डे फोटो व्हायरल
रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान, काढलेल्या या फोटोंमध्ये सलमानसोबत रितेश देशमुख तसेच इतर कलाकारही दिसत आहे. सलमान आणि रितेशव्यतिरिक्त या फोटोंमध्ये साऊथस्टार राम चरण आणि त्याची पत्नी देखील दिसत आहे. तसेच जेनेलिया देशमुख, अर्पिता खान, शब्बीर अहलुवालिया आणि कांची कौल दिसत आहे. सलमानच्या बर्थ डेचे फोटो रितेशने सोशल मीडियात शेअर केले असून, त्यानं कॅप्शनमध्ये सर्वांचाच उल्लेख देखील केला आहे. रितेशने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'भाऊंचा वाढदिवस आणि सर्व प्रियजन एकाच प्रेफमध्ये आहेत. विशेषत: राम चरण आणि उपासना. तुम्हा दोघांना भेटून खूप आनंद झाला.
सलमान अन् राम चरणमध्ये 'याराना'
View this post on Instagram
दरम्यान, वाढदिवसाच्या पार्टीतील राम चरणचे आणखी काही फोटो समोर आले आहेत. यातून सलमान आणि राम चरण यांच्यातील मैत्री किती घट्ट आहे, हे दिसून येते. वाढदिवसातील फोटोंमध्ये सलमानच्या शेजारी राम चरण उभा आहे. फोटोंमध्ये सर्वजण आनंदात आणि हसत दिसत आहेत. दरम्यान, सलमानच्या मजेदार हावभावाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
'भाऊ की भेळ'
रितेश आणि जनेलिया सलमान खानच्या अत्यंत जवळचे मानले जातात. जेनेलियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात सलमान स्वत: रितेश देशमुखसाठी भेळ बनवत असल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओ शेअर करताना जेनेलियाने एक मजेशीर कॅप्शन देखील दिलं आहे. 'भाऊ की भेळ', असं कॅप्शन देत तिनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.























