Salim Ghouse : छोट्या पडद्यावरील मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारे अभिनेते सलीम घोष (Salim Ghouse) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  


1978 मध्ये सलीम यांनी अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. मंथन, चक्र, कलयुग, सारांश, त्रिकाल आघात, द्रोही, मोहन जोशी हाजिर हो, सरदारी बेगम, कोयला, सोल्जर या हिट चित्रपटांमधील सलीम यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.  ये जो है जिंदगी, सुबह, भारत एक खोज आणि संविधान या मालिकांमध्ये सलीम यांनी काम केलं आहे. 


सलीम घोष यांच्या पत्नी अनीता सलीम घोष यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, काल रात्रीपर्यंत सलीम हे ठिक होते. त्यांनी सर्व कामे केल्यानंतर जेवण केलं. पण अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना मुंबईतील अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 


 अभिनेता शरीबनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, 'मी सलीम घोष यांना पहिल्यांदा सुबह या मालिकेमध्ये पाहिलं. तेव्हा त्यांचा आवाज मला खूप आवडला होता. '






महत्वाच्या बातम्या :