Deepika Padukone : प्रसिद्ध अभिनेत्री  दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने बॉलिवूड बरोबरच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली. आता  75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या (75th cannes film festival) ज्युरी मेंबर्सच्या यादीत दीपिकाच्या नावाचा समावेश झाला आहे. दीपिकानं याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे.


फ्रान्समधील प्रसिद्ध अभिनेता विंसेट लिंडन यांना फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरींचे अध्यक्ष पद देण्यात आले आहे. तसेच दीपिका ही पॅनल सदस्य आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल हे या वर्षी 17 मे ते 28 मे या दरम्यान आयोजित केले जाणार आहे. या  फेस्टिव्हलच्या (Cannes Film Festival) रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींचे लूक हे चर्चेत असतात.   
  
दीपिकानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये लिहिले आहे की, 'दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही भारत देशातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती प्रोड्यूसर, सोशल वर्कर आणि अभिनेत्री आहे. तिने 30 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. xxx: Return of Xander Cage या चित्रपटामधून तिनं हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या पीकू आणि छपाक या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. '






दीपिकानं ओम शांती ओम या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या गेहरांईया या चित्रपटामध्ये  या चित्रपटामधील दीपिकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच लवकरच तिचे इंटर्न आणि पठाण हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 


महत्वाच्या बातम्या :