Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) 14 एप्रिल 2022 रोजी अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) लग्नबंधनात अडकली. आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लवाली होती. आता नुकतीच आलियाला एक गुड न्यूज मिळाली आहे. आलियाचे नाव इंस्टाग्रामच्या टॉप-5 चित्रपटसृष्टीतील इनफ्लुएन्सर्सच्या यादीत सामिल झाले आहे.
रिपोर्टनुसार, इंस्टाग्रामच्या टॉप-5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीत सामिल होणारी आलिया ही एकमेव भारतीय आणि आशियाई अभिनेत्री ठरली आहे. आलियानं टॉप-5 इनफ्लुएन्सर्सच्या यादीत चौथे स्थान मिळवले आहे. या यादीमध्ये पहिले नाव हे हॉलीवुड स्टार जेंडायाचे आहे तर दुसरे नाव हे टॉम हॉलंडचे आहे. तसेच या यादीमध्ये विल स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि जेनिफर लोपेझ पाचव्या स्थानावर आहे.
आलियाच्या आरआरआर आणि गंगूबाई काठियावाडी या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तसेच लवकरच तिचे ब्रह्मास्त्र, रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि जी ले जरा हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. लवकरच आलिया हॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे. आलिया ही 'हार्ट ऑफ स्टोन'या चित्रपटामधून हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.
महत्वाच्या बातम्या :