एक्स्प्लोर

हायप्रोफाईल एरियात घर, आसपास CCTV चं जाळं, गेटवर सुरक्षारक्षकांचा वेढा, तरीही सैफच्या घरात चोर घुसलाच कसा?

Saif Ali Khan Injured: सैफच्या घरात घुसून त्याच्यावर करण्यात आलेल्या हल्ला प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी सध्या याप्रकरणी सैफच्या घरात काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं आहे.

Saif Ali Khan Injured: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांच्या घरात रात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीनं घुसखोरी केली. त्यानंतर सैफिनाच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्या अज्ञात व्यक्तीला पाहिलं आणि आरडाओरडा केला. त्यानंतर सैफ अली खान आणि घरात घुसलेली व्यक्ती आमने-सामने आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 2 वाजताच्या सुमारास एका हल्लेखोरानं अभिनेत्याच्या घरात प्रवेश केला आणि त्याच्यावर चाकूनं हल्ला केला, त्यानंतर  सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, चाहत्यांकडून सोशल मीडियावर सैफ अली खानला लवकर बरं वाटावं, यासाठी प्रार्थना केली जात आहे. 

सैफ अली खानच्या टीमकडून एक अधिकृत निवेदन समोर आलं आहे, ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, सैफ अली खानच्या घरी रात्रीच्या सुमारास चोर घुसला होता. सध्या त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना धीर धरण्याची विनंती करतो. या घटनेचा सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरात चोर शिरल्याचं सर्वात आधी त्याच्या घरातील एका महिला कर्मचाऱ्यानं पाहिलं. त्याला पाहून महिला कर्मचाऱ्यानं आरडाओरडा केला. त्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीनं तिच्या हातावर चाकूनं वार केले. महिला कर्मचाऱ्यानं आरडाओरडा केल्यानंतर सैफ अली खान धावत बाहेर आला आणि तिच्या मदतीसाठी धावला. सैफ अली खाननं अज्ञात व्यक्ती आणि सैफमध्ये झटापट झाली. त्यावेळी आरोपीनं हातातील चाकूनं सैफवर सहा वार करत पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

सैफच्या घरात चोर घुसलाच कसा? 

सैफच्या घरात घुसून त्याच्यावर करण्यात आलेल्या हल्ला प्रकरणाचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी सध्या याप्रकरणी सैफच्या घरात काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं आहे. तसेच, त्या तिन्ही कर्मचाऱ्यांचे मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर, ज्या महिला कर्मचाऱ्यावर पोलिसांनी वार केले होते. त्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जी व्यक्ती घरात घुसली तिचा कुणाशी संपर्क झालेला का? किंवा सैफच्या घरातलं कुणी आधीपासूनच त्या व्यक्तीच्या संपर्कात होतं का? अशा पद्धतीची माहिती पोलीस घेत आहेत. तीन मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

वांद्रे परिसरात सैफ अली खानचं घर आहे. वांद्रे परिसर म्हणजे, हायप्रोफाईल एरिया. इमारतीत प्रवेश करणं तसं फारसं सोपं नाही. कारण इमारतीभोवती सुरक्षा रक्षकांचं जाळ कायम असतं. इमारतीला दोन गेट आहेत. एक मोठा गेट, चारचाकी गाडी जाण्यासाठी आणि दुसरा एक लहान गेट व्यक्तींना ये-जा करण्यासाठी. जर कुणालाही इमारतीत प्रवेश करायचा असेल, तर सुरक्षा रक्षकांना सामोरं जाऊन त्यानंतरच इमारतीत प्रवेश मिळतो. त्यानंतर इमारतीच्या आवारात आणि आसपासच्या परिसरात सीसीटीव्हीचं जाळं आहे. त्यामुळे कुणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, तर कुणाच्याच नजरेतून सुटू शकत नाही. त्यामुळे इमारतीत प्रवेश करणं तितकसं सोपं नाही. 

सैफ अली खान वांद्रे परिसरात असलेल्या एका इमारतीत 12 व्या मजल्यावर राहतो. बाराव्या मजल्यावरच्या बाल्कनीतून चोर घरात शिरल्याची माहिती मिळत आहे, जे जवळपास अशक्य असल्याचं वाटतंय. त्यामुळे चोर नक्की बाहेरुन इमरातीत आला की, तो इमारतीमधलाच कुणी होता? अशा प्रश्नही सध्या उपस्थित होत आहे. आता नेमकी ती अज्ञात व्यक्ती सैफच्या बाराव्या मजल्यावरच्या घरात घुसलीच कशी? हे पोलीस तपासात समोर येईल. 

तब्बल अडीच तास चाललं सैफवर ऑपरेशन 

सैफ अली खानची शस्त्रक्रिया सुमारे अडीच तास चाललं. सध्या सैफला ओटीच्या रिकव्हरी रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफवर धारदार शस्त्रानं सहा वेळा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या मानेला, डाव्या मनगटाला, छातीला दुखापत झाली आणि चाकूचा एक छोटासा भाग त्याच्या पाठीतून काढण्यात आला होता. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे तातडीनं ऑपरेशन करावं लागल्याची माहिती मिळत आहे. 

पाहा व्हिडीओ : Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Saif Ali Khan Injured: सैफच्या मानेवर 10 सेमीची जखम, हातावर 10 वार, पाठीत धारदार शस्त्रही खुपसलं; मध्यरात्री 2 वाजता नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रमDhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan : सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांकडून प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
PM Kisan : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 कधी येणार?शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2 हजार कधी येणार,शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
Embed widget