एक्स्प्लोर
Sadak 2 : आधीच वादात असलेला सडक 2 आणखी अडचणीत, आता विश्व हिंदू परिषदेचाही विरोध
सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवरुन वाद सुरु आहे. यात अभिनेत्री आलिया भट्टला वारंवार विरोधाचा सामना करावा लागत आहे. महेश भट्ट यांच्या 'सड़क 2' ला बायकॉट करण्याची मोहिमच सुरु झाली आहे.
मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवरुन वाद सुरु आहे. यात अभिनेत्री आलिया भट्टला वारंवार विरोधाचा सामना करावा लागत आहे. महेश भट्ट यांच्या 'सड़क 2' ला बायकॉट करण्याची मोहिमच सुरु झाली आहे. याचाच प्रत्यय यूट्यूबवर सिनेमाच्या ट्रेलरला सर्वाधिक डिसलाईकच्या माध्यमातून दिसून आला आहे. आता या चित्रपटाला विश्व हिंदू परिषदेने देखील विरोध केला आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप विहिंपने केला आहे.
विश्व हिंदू परिषदेचे प्रचार प्रमुख विजय शंकर तिवारी यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. यात ते म्हणतात, ''महेश भट्ट यांच्या दिग्दर्शनात बनलेला चित्रपट सडक 2 मध्ये हिंदू आस्थेला अपमानित केलं आहे. हा चित्रपट हॉटस्टारवर दाखवला जाणार आहे. या चित्रपटात केवळ नेपोटिझमचे प्रोडक्ट्स भरलेले आहेत. ज्याला महेश भट्ट पुढं करत आहेत. केंद्र सरकार यावर कारवाई करावी", असं ते म्हणाले.
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलिया भट्टच्या तोंडी एक संवाद आहे. ज्यात ती म्हणतेय की, 'फेक गुरुंमुळे मी खूप काही गमावलं आहे.' यावरुन हा सगळा वाद सुरु झाला आहे.
'सडक 2' चित्रपटाचा ट्रेलर 12 ऑगस्ट रोजी रिलीज झाला आणि यू ट्यूबवर ट्रेण्डही होत आहे. या ट्रेलरला सर्वाधिक जास्त डिसलाईक मिळाले आहे, जो एक विक्रमच म्हणावा लागेल. तर हा ट्रेलर लाईक करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे.
याचा अर्थ स्पष्ट आहे की लोक मोठ्या संख्यने 'सडक 2'चा ट्रेलर नक्कीच पाहत आहेत, परंतु बॉलिवूमध्ये नेपोटिझम आणि नेपोटिझमच्या केंद्रस्थानी असलेल्या कलाकारांना घेऊन बनवलेल्या या चित्रपटाबाबत आपला संताप व्यक्त करताना थेट डिसलाईकचं बटण क्लिक करत आहेत. प्रेक्षक थेट 'सडक 2' च्या ट्रेलरवर निशाणा साधत आहेत.
Sadak 2 Trailer : रोमान्ससह अॅक्शनचा तडका, सडक 2 चा दमदार ट्रेलर लॉन्च
या चित्रपटात संजय दत्त, आलिया भट्ट, पूजा भट्ट आणि आदित्य रॉय कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हे सर्व कलाकार फिल्मी घराण्यातील आहे. प्रमुख भूमिकेत असलेल्या आलिया आणि पूजा या दोघी चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट यांच्या मुली आहेत. विशेष म्हणजे महेश भट आणि चित्रपटाचे निर्माते मुकेश भट यांचे वडीलही चित्रपटसृष्टीतीलच होते. नानाभाई भट आपल्या काळातील प्रख्यात सिनेमॅटोग्राफर होते. तर संजय दत्त हा सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांचा मुलगा आहे. याशिवाय आदित्य रॉय कपूर हा चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरचा भाऊ आहे.
नेपोटिझमने भरलेला हा चित्रपट न पाहण्याचे संकेत प्रेक्षक ट्रेलर डिसलाईक करुन देत आहेत. सोशल मीडियार या चित्रपटाच्या ट्रेलरवर कठोर शब्दा कमेंट आणि टिप्पणी केली जात आहे. यावरुनच त्यांची नाराजी स्पष्ट होत आहे.
नेपोटिझमुळे 'सडक 2' न पाहण्याचं आणि ज्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे ते म्हणजेच डिस्ने हॉटस्टार अॅप अनइन्स्टॉल करण्याची विनंती काही जण करत आहे. इतकंच नाही या चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री आलिया भटने हा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर केला, मात्र तिने आपला कमेंट बॉक्स बंद केला, जेणेकरुन नेटिझन्स तिच्यावर किंवा चित्रपटावर काही वाईटसाईट कमेंट्स करु नयेत.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने बॉलिवूडला जोरदार झटका बसला. लोक सातत्याने सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्याची मागणी करत आहेत. तर नेपोटिझमवरुन बॉलिवूडच्या स्टारकिड्स विरोधात संतापही व्यक्त करत आहेत. परंतु त्याचा फटका सध्या 'सडक 2'च्या ट्रेलरला बसत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement