Onkar Bhojane : त्याने पैशांसाठी हास्यजत्रा सोडली? ओंकार भोजनेच्या प्रश्नावर सचिन गोस्वामींनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
Sachin Goswami on Onkar Bhojane : ओंकार भोजनेने हास्यजत्रा का सोडली या प्रश्नावर सचिन गोस्वामी यांनी अखेर मौन सोडलं आहे.
Sachin Goswami on Onkar Bhojane : महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) फेम ओंकार भोजने हा काही महिन्यांपूर्वी बराच चर्चेत होता. कारण ओंकारने (Onkar Bhojane) महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडली आणि त्याला बरंच ट्रोल करण्यात आलं. कारण पहिल्यांदा त्याने हा कार्यक्रम सोडल्यावर पुन्हा एकदा एन्ट्री केली. पण त्यानंतरही ओंकारने हा कार्यक्रम सोडला. त्यावेळी त्याने पैशांसाठी हा कार्यक्रम सोडला असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. त्यावर आता कार्यक्रमाचे सर्वोसर्वा सचिन गोस्वामी यांनी यावर मौन सोडलं आहे.
सचिन गोस्वामी यांनी नुकतीच महाराष्ट्र टाईम्सला मुलाखत दिली. यावर ओंकारच्या प्रश्नावर सचिन गोस्वामी यांनी भाष्य केलं आहेत. तसेच कार्यक्रम सोडून गेलेल्या कलाकांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिलीये. ओंकार हा तसा मुलगा वाटत नाही, असं म्हणत सचिन गोस्वामी यांनी ओंकारची बाजू घेतली.
सचिन गोस्वामी यांनी काय म्हटलं?
सचिन गोस्वामी यांनी यावर बोलताना म्हटलं की, वाढीव मानधनासाठी ओंकारने हास्यजत्रा सोडली हे खोटं आहे. कारण ओंकार तसा मुलगा अजितबातच नाही. हास्यजत्रेनंतर ओंकार हा कलर्स मराठीवरील हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमात दिसला होता. पण अवघ्या काही दिवसांतच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतरही ओंकार बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. आता सचिन गोस्वामी यांनी ओंकारची बाजू घेऊन साऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली असल्याचं पाहायला मिळतंय.
कार्यक्रम सोडून गेलेल्या कलाकारांना पुन्हा घेणार का?
अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम बराच चर्चेत आलाय. कारण अनेक दिवसांपासून हा कार्यक्रम बंद होता. तसेच अनेक कलाकारांनी हा कार्यक्रम सोडला. ते कलाकार पुन्हा या कार्यक्रमामध्ये दिसणार का? यावरही सचिन गोस्वामी यांनी या मुलाखतीमध्ये उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, गेल्या सहा वर्षांमध्ये तीन ते चार जणांनी हा कार्यक्रम सोडल. त्यातले काही परतही आलेत. तसेच इतर कलाकारही ब्रेक घेत घेतच काम करतात.ओंकारसोबत आमचे आजही चांगले संबंध आहेत. तर विशाखा सुभेदारसोबतही आमचं बोलणं होत असतं. संत तुकडोजी महाराज यांच्या अभंगाच्या ओळी सांगत सचिन गोस्वामी पुढे म्हणाले की, 'येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा.. कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या...'