एक्स्प्लोर

RUNWAY 34 Teaser : 35000 फूट उंचावर अजय देवगणचं उड्डाण, ‘रनवे 34’चा जबरदस्त टीझर पाहिलात?

RUNWAY 34 Movie update : अजय देवगण या चित्रपटात पायलटच्या भूमिकेत दिसत आहे, तर ‘बिग बी’ अमिताभ बच्चन एका सरकारी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत.

RUNWAY 34 Teaser Out : सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) गेल्या काही काळापासून मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारताना दिसत आहे. आता तो पुन्हा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर आला आहे. मागील बऱ्याच दिवसांपासून अजय देवगण दिग्दर्शित 'रनवे 34' (Runway 34) या चित्रपटाची बरीच चर्चा सुरु होती. आता त्याच्या या चित्रपटाचा दमदार टीझरही रिलीज झाला आहे.

या 48 सेकंदांच्या टीझरच्या सुरुवातीला एक विमान उडताना दिसत आहे, ज्यामध्ये मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे काही समस्या दिसू लागतात. यानंतर अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि अजय देवगण विमान उडवताना दिसत आहेत.  त्यांचे चेहरे पाहून ते कोणत्यातरी मोठ्या संकटात अडकले आहेत, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. यादरम्यान अजय देवगणला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आठवू लागतात.

पाहा जबरदस्त टीझर :

RUNWAY 34 Teaser : 35000 फूट उंचावर अजय देवगणचं उड्डाण, ‘रनवे 34’चा जबरदस्त टीझर पाहिलात?

‘या’ रिलीज होणार ट्रेलर

अवघ्या 48 सेकंदांच्या या टीझरने प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता वाढवली आहे. यासोबतच 'रनवे 34'चा ट्रेलर 21 मार्चला रिलीज होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अजय देवगण या चित्रपटात पायलटच्या भूमिकेत दिसत आहे, तर ‘बिग बी’ अमिताभ बच्चन एका सरकारी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच अजयने यात मुख्य भूमिकाही साकारली आहे.

'रनवे 34' या दिवशी रिलीज होणार!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'रनवे 34' एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाचे कथानक 2015 मध्ये घडलेल्या एका खऱ्या घटनेभोवती फिरते. कुमार मंगत पाठक, विक्रांत शर्मा, हसनैन हुसैनी, संदीप हरीश केवलानी, तरलोक सिंह जेठी आणि जय कनुजिया यांच्या सह-निर्मित या चित्रपटात बोमन इराणी, युट्युबर कॅरी मिनाटी अर्थात अजय नागर आणि आकांक्षा सिंह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 29 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget