एक्स्प्लोर

'पुष्पा 2'चं वादळ रोखण्यासाठी एसएस राजामौलींचा 'मास्टरप्लान'; रिलीज करणार 'हा' बहुचर्चित चित्रपट 

RRR Behind And Beyond Trailer Release: एसएस राजामौली यांनी आरआरआर चित्रपटाचं मेकिंग रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. RRR बिहाइंड अँड बियॉन्डचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

RRR Behind And Beyond Trailer Release: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) या चित्रपटानं भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये वादल आणलं आहे. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. या चित्रपटानं आतापर्यंत चांगली कमाई केली आहे. वरुण धवनचा बेबी जॉन हा चित्रपटही याच महिन्यात प्रदर्शित होणार आहे. ज्याचं दिग्दर्शन ॲटली कुमारनं केलं आहे. पण, आता या दोन दिग्गज दिग्दर्शकांच्या चित्रपटांना टक्कर देण्यासाठी एसएस राजामौली सज्ज झाले असून लवकरच ते आपला धमाकेदार चित्रपट रिलीज करत आहेत. आरआरआर चित्रपटाला मिळालेलं यश पाहता, आता एसएस राजामौली यांनी आरआरआर चित्रपटाचं मेकिंग रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. एसएस राजामौली यांनी आजवर अनेक दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांच्या सुपरडुपर हिट ठरलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे,  RRR. या चित्रपटानं फक्त बॉक्स ऑफिसवरच धमाल केली नाहीतर संपूर्ण देशातून खूप प्रेम आणि प्रशंसा मिळवली आहे. 

एवढंच नाही तर स्टीव्हन स्पीलबर्ग, जेम्स कॅमेरून आणि रुसो ब्रदर्स यांसारख्या हॉलिवूड दिग्गजांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 2022 मध्ये, जगानं RRR सारखा जबरदस्त चित्रपट पाहिला. जबरदस्त व्हिज्युअल्स, जबरदस्त ॲक्शन सीन्स, एक दमदार कथा आणि प्रतिभावान स्टार कास्ट असलेल्या या चित्रपटानं यशाचं एक नवं उदाहरण ठेवलं आणि बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडीत काढले. एस. एस. राजामौली यांनी रिलीजच्या वेळी खळबळ माजवणारा राजामौलीचा आरआरआर आजही एका अनोख्या सिनेमाचं उदाहरण आहे. आता निर्मात्यांनी RRR बिहाइंड अँड बियॉन्डचा ट्रेलर आणला आहे. 

RRR हा अशा काही चित्रपटांपैकी एक आहे ज्याने मनोरंजन उद्योगाची व्याख्या बदलली. मैत्री, देशभक्ती, राग, प्रेम अशा प्रत्येक भावनेला स्पर्श करणाऱ्या या चित्रपटानं प्रेक्षकांना थक्क केलं. आता निर्मात्यांनी RRR Behind and Beyond चा ट्रेलर लाँच केला आहे, जो आपल्याला या ब्लॉकबस्टरच्या आठवणींच्या प्रवासात घेऊन जातो. 20 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

RRR मधली डान्स स्टेप विशेष गाजली. तसेच, सर्वच गाणी जगभरात हीट ठरली. मग ते नाटू नाटू, दोस्ती असो वा कोमुराम भीमुदो, या रामम राघवम हो ही गाणी सर्वांनाच आवडली. याशिवाय चित्रपटातील ॲक्शन सीन्समुळे चित्रपटाचं आकर्षण आणखी वाढलं आहे, जे प्रेक्षकांना खूप आवडलं. या चित्रपटानं एक मोठं आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं जग सर्वांसमोर सादर केलं, ज्यामध्ये उत्कृष्ट VFX वापरले गेले आहेत. हा चित्रपट दिग्दर्शक एस. एस. राजामौलीचा बाहुबली 2 नंतर  पुढचा प्रोजेक्ट बाहुबली 2 : द कन्क्लूजन आहे. 

RRR हा खऱ्या अर्थानं एक खास चित्रपट होता, ज्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली आणि खूप प्रशंसा मिळवली. या चित्रपटाचे परदेशी चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांनी विशेषत: हॉलिवूडनं खूप कौतुक केलं. चित्रपट निर्माते स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी आरआरआरचं कौतुक करताना म्हटलं की, "मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता - ही एक भेट होती... ते पाहणं आणि अनुभवणं विलक्षण होतं." जेम्स कॅमेरून यांनी चित्रपटाच्या स्क्रीन प्ले, दिग्दर्शन आणि संगीताचं कौतुक केलं. त्याला RRR इतका आवडला की, त्यानं तो दोनदा पाहिला. रुसो ब्रदर्सनंही आरआरआर आणि त्याचं संचालक एस. एस. राजामौली यांचं कौतुक केलं. जो रुसो म्हणाले, "मी आरआरआर पाहिला आहे, आणि तो विलक्षण आहे." ते पुढे म्हणाले की, "मला (RRR) बद्दल जे आश्चर्यकारक वाटतं ते म्हणजे, त्याची भावना, त्याच्या भव्यतेसह, ज्यामुळे प्रेक्षकांवर प्रभाव पडतो."

पाहा ट्रेलर : RRR बिहाइंड अँड बियॉन्ड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Cabinet Portfolio :  मंत्रिमंडळाचं खातेवाटप दुपारी 12 वाजेपर्यंत होणारABP Majha Headlines :  9 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सShashikant Shinde meet Ajit Pawar : नागपुरातील निवासस्थानी शशिकांत शिंदे-अजित पवार भेटTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार? देवेंद्र फडणवीसांविषयीच्या ममत्त्वभावामुळे चर्चांना उधाण
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
IPO : MobiKwik, विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेसचे आयपीओ लिस्ट होणार, गुंतवणूकदार मालामाल होणार,GMP कितीवर? 
शेअर बाजारात 3 मेनबोर्ड आयपीओचं लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल होणार, GMP कितीवर?
EPFO :पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, व्याजदराबाबत नवी अपडेट, ईपीएफओ मोठ्या निर्णयाच्या तयारीत 
मोठी बातमी, पीएफ खातेदारांना दिलासा मिळणार, व्याजदराबाबत मोठी अपडेट, ईपीएफओची विशेष रणनीती
Embed widget