एक्स्प्लोर

रोहन गोडांबे यांच्या जिद्दीचा प्रवास; नवी इनिंग निर्मितीची

Rohan Godambes :  केवळ छंद किंवा हौस म्हणून काम करणारे आणि त्या हौसचे संधीत रूपांतर करणारे फार क्वचित लोक असतात.

Rohan Godambes :  केवळ छंद किंवा हौस म्हणून काम करणारे आणि त्या हौसचे संधीत रूपांतर करणारे फार क्वचित लोक असतात. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ आवड आणि जिद्द या बळावर कार्यकारी निर्माता ते निर्माता असा प्रवास सुरू करणारे रोहन गोडांबे यांची गोष्ट ही चित्रपटातल्या नायकासारखी आहे. ‘अपने  हौंसले को कभी मत बताओ कि तुम्हारी तकलीफ कितनी बड़ी है अपनी तकलीफ को यह बताओ की तुम्हारा हौसला कितना बड़ा है’! या उक्तीनुसार शालेय जीवनापासून कलेच्या प्रांतात मुशाफिरी करणाऱ्या गुरुतुल्य व्यक्तींच्या सानिध्यात कलेचे धडे गिरवत आपला प्रवास करणाऱ्या रोहन यांना अभिनयापेक्षा बॅकस्टेज सांभाळण्याची कसरत अधिक आवडू लागली. या आवडीतून त्यांचा चित्रपटसृष्टीचा श्रीगणेशा घडला. रोहन गोडांबे (Rohan Godambes) यांनी आपली क्षमता, आपले प्रयत्न ह्यांतून आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरू केला. 

एखादी घडी नीट नसेल तर परफेक्ट चौकट तयार होत नाही चित्रपटाचे सुद्धा गणित जमवायचे असले तर व्यवस्थापनेची घड़ी नीट हवी. मुलाच्या संगोपनाची जबाबदारी आईची असते. सगळी व्यवधान सांभाळून व्यावस्थापनेचे कौशल्य दाखविणाऱ्या आईप्रमाणे कार्यकारी निर्मात्यालाही चित्रपटरूपी गोंडस बाळाची काळजी घ्याची असते. चित्रपटाच्या घोषणेपासून ते प्रदर्शनापर्यंत कार्यकारी निर्मात्याची भूमिका महत्वाची ठरते. जिद्द आणि 'पुढे जायचं' ही इच्छा धरून रोहन गोडांबे यांनी आपल्या स्वप्नांचा प्रवास सुरू केला. या प्रवासात बिपीन नाडकर्णी यांचे मार्गदर्शन अतिशय मोलाचे ठरले.  मिळालेल्या संधीचं सोनं करत आज इंडस्ट्रीत रोहन गोडांबे हे नाव होताना दिसतंय.

लाइन प्रोडयुसर, कार्यकारी निर्माता ते निर्माता हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. 22 वर्षे इंडस्ट्रीत प्रचंड काम केल्यानंतर आलेल्या अनुभवातून त्यांनी स्वत:च्या ‘असमथी प्रोडक्शन्स’ या निर्मीती संस्थेअंतर्गत काही वेबसीरिज आणि मराठी चित्रपटांच्या निर्मीतीची धुरा उचलली आहे. लवकरच याबाबतची घोषणा करण्यात येइल. चित्रपटसृष्टीत तसा कोणताही गॉडफादर नसताना रोहन गोडांबे यांनी आपल्या मार्गदर्शकांची साथ, घरच्यांचा पाठींबा आणि जिद्दीच्या जोरावर चित्रपटनिर्मितीच्या स्वप्नाची मजल गाठली आहे. 

‘उत्तरायण’ ‘एवढंस आभाळ’, ‘नटरंग’, ‘बालक ‘पालक’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’, ‘यलो’, ’न्यूड’,  ‘डोक्याला शॉट’, विकून टाक, अलीकडचा ‘बीटरस्वीट’ या दर्जेदार मराठी चित्रपटांसोबत झोया अख्तर दिग्दर्शित ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘किरण राव दिग्दर्शित ‘धोबी घाट’ आंतरराष्ट्रीय फिल्म ‘नोरा’ यासारख्या चित्रपटांच्या कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. ‘अॅड’वर्ल्ड मध्येही त्यांनी बरचं काम केलं आहे. 

आपल्या प्रवासाबद्दल बोलताना रोहन सांगतात की, ‘गुणात्मकता आणि गुणवत्ता महत्त्वाची आहे. हिंदी चित्रपटसृष्टीची काम करण्याची शिस्त, त्यांचे नियोजन या सगळ्या गोष्टी आत्मसात करून खूप काही शिकता आलं. माझ्या प्रत्येक कामातल्या अनुभवातून काही ना काही शिकायला मिळालं. सुंदर प्रवास होता हा. मला तर वाटतं की, प्रत्येक चित्रपट हाच एक टर्निंग पॉइंट होता. ही सगळी शिदोरी घेऊन माझ्या निर्मीतीची पुढची वाटचाल मी पार करत प्रेक्षकांना वेगळं काहीतरी चांगल देणार हे नक्की’!

हे ही वाचा :

Bollywood Actress : आलिया, प्रियांका अन् कतरिना... एका चित्रपटासाठी एवढे मानधन घेतात 'या' अभिनेत्री

Tarak Mehta Ka Ooltah Chashma : माधवी भिडे आहे कोट्यवधींची मालकिण; आलिशान घर, लग्झरी कार आणि बरंच काही

 

महत्त्वाच्या बातम्या

लग्नाआधीच आई व्हायचं होतं स्वरा भास्करला! अनोळखी डोनरसह 2 वेळा IVF केलं; CAA आंदोलनानं बदललं आयुष्य
लग्नाआधीच आई व्हायचं होतं स्वरा भास्करला! अनोळखी डोनरसह 2 वेळा IVF केलं; CAA आंदोलनानं बदललं आयुष्य
Drishyam 3 Advance Booking: दृश्यम 3’च्या तिकिटांसाठी चढाओढ! 48 तासांत तिकिटांची तुफान विक्री, कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क  
दृश्यम 3’च्या तिकिटांसाठी चढाओढ! 48 तासांत तिकिटांची तुफान विक्री, कमाईचा आकडा पाहून व्हाल थक्क  
Sushant Singh Rajputs Sister: सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय आढळलं? 6 वर्षानंतर बहीण श्वेताने सगळंच सांगितलं, 'पाय मोडला, डोळ्यात जखमा..'
सत्या-मंजूच्या लग्नासाठी चाहत्यांनी दिला अनोखा आशीर्वाद; अंतरपाटावर उमटले हातांचे ठसे, पाहा लग्नसोहळ्याची खास झलक
सत्या-मंजूच्या लग्नासाठी चाहत्यांनी दिला अनोखा आशीर्वाद; अंतरपाटावर उमटले हातांचे ठसे, पाहा लग्नसोहळ्याची खास झलक

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
Embed widget