एक्स्प्लोर

Ritiesh Deshmukh : आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण, पण राजकोट किल्ल्यावरील घटनेवर रितेश देशमुखची तीनच शब्दांत प्रतिक्रिया

Ritiesh Deshmukh : मालवण राजकोटच्या घटनेवर अभिनेता रितेश देशमुख याने तीनच शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 

Ritiesh Deshmukh :  नौदल दिनानिमित्त मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा 35 फूट पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. पण 26 ऑगस्ट रोजी शिवाजी महाराजांचा हा पुतळा निकृष्ट कामामुळे कोसळला. या घटनेनंतर सोशल मीडियावर बरेच पडसाद उमटू लागले. त्यातच आता अभिनेता रितेश देशमुखचीही (Ritiesh Deshmukh) प्रतिक्रिया समोर आली आहे. 

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. दरम्यान या पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती, असं पत्र पालकमंत्र्यांकडून दाखवण्यात आलं. पण या घटनेमुळे राजकीय वर्तुळातलं वातावरण चांगलच पेटलं आहे. त्याचप्रमाणे आता आरोप प्रत्यारोपांचं सत्रही सुरु झालंय. असं असलं तरी या घटनेमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याची चित्र सध्या आहे. 

रितेश देशमुखची तीनच शब्दांत प्रतिक्रिया

अभिनेता रितेश देशमुख याने या घटनेवर व्यक्त होत केवळ तीनच शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. रितेशने एक्स पोस्ट करत महाराजांची माफी मागितली असून, 'राजे माफ करा' असं म्हटलं आहे. रितेशच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.  

पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला!

संभाजीराजे यांनी ट्विट करत टीकास्त्र सोडलं आहे. संभाजीराजे यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार! आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे.

कसा  होता मालवण येथील शिवाजी महाराज पुतळा?

  • किल्ले राजकोट परिसराचं सुशोभीकरण तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जमिनीपासून उंची सुमारे 43 फूट एवढी आहे.
  • बांधकाम जमिनीपासून 15 फूट तर त्यावर 28 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असं स्ट्रक्चर आहे.
  • हा पुतळा नौसनेकडून उभारण्यात आला.
  • ज्याचं उद्घाटन 4 डिसेंबर 2023 रोजी, नौसेना दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले.
  • पुतळ्याची किंमत 2 कोटी 40 लाख 71 हजार एवढी रुपये एवढी होती.
  • कल्याणचा तरूण शिल्पकार आणि मालवणचा सुपुत्र जयदीप आपटे यांनी हे शिल्प बनवलं आहे. 

ही बातमी वाचा : 

धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटी पुतळा कोसळला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
Sakri Vidhan Sabha Constituency : विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : साक्री मतदारसंघात गावित, चौरे, सूर्यवंशींमध्ये तिरंगी लढत, कोण मारणार बाजी?
Sharad Pawar : 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? शरद पवारांच्या भूमिका काय होत्या?
Rohit Sharma Ritika Sajdeh Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
इथं दोघांना पाडा, येवल्यातून मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन; हाती 2 माईक घेऊन भुजबळांना टोला
CM Yogi Adityanath : अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
अमल महाडिकांच्या प्रचारार्थ उद्या सीएम योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; तपोवन मैदानात जाहीर सभा
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
×
Embed widget