एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rishi Kapoor Passes Away | शेवटच्या ट्वीटमध्ये ऋषी कपूर यांनी हात जोडून केली 'ही' विनंती
अभिनेता इरफान खानच्या निधनाला 24 तासदेखील पूर्ण होत नाहीत तोच कलाक्षेत्रातील दुसरी दु:खद बातमी समोर आली आहे.ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले. ते 67 वर्षांचे होते.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं मुंबईत निधन झालं. मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेता इरफान खानच्या निधनाला 24 तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर सिनेक्षेत्रातून ही दुसरी दु:खद बातमी समोर आली आहे.
ऋषी कपूर हे ट्विटरवर खूप सक्रिय होते. त्यांच्या ट्वीटची नेहमी चर्चा व्हायची. अनेकदा त्यांनी केलेल्या ट्विटमुळे ते वादाच्या भोवऱ्यात देखील सापडले होते. त्यांनी आपले शेवटचे ट्वीट 2 एप्रिलला केले होते. यामध्ये त्यांनी कोरोना व्हायरसविरोधात लढणाऱ्या डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांना सलाम केला होता. तसंच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांवर हल्ल्यांच्या घटनांवर भाष्य केलं होतं. यात त्यांनी म्हटलं होतं की, 'सर्व भाऊ-बहिणींना हात जोडून एक आवाहन. कृपया हिंसा, दगडफेक किंवा लिंचिंगचा अवलंब करु नका. डॉक्टर, नर्स, मेडिक्स, पोलिस वगैरे आपले आयुष्य धोक्यात घालून आपले जीव वाचवत आहेत. आपल्याला हे कोरोना व्हायरस विरोधातील युद्ध जिंकायचे आहे. जय हिंद!'
वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील सर एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांना एक आठवड्यापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सलग दुसऱ्या दोन कलाकार गमावल्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. "कॅन्सरच्या आजारातील गुंतागुंतीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ते मागील एक आठवड्यापासून तिथेच आहेत. यावेळी उपचारादरम्यान त्यांना अनेक वेळा व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं," अशी माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू सिंह या त्यांच्यासोबत रुग्णालयात होत्या. ऋषी कपूर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून कॅन्सरचा इलाज करुन मुंबईत परतले होते. या उपचारादरम्यान ऋषी कपूर अमेरिकेतील रुग्णालयात 11 महिने आणि 11 दिवस होते. तिथून परतल्यानंतर उपचार यापुढेही सुरु राहतील आणि ठणठणीत बरं होण्यासाठी काही काळ लागेल, असं त्यांनी सांगितलं होतं.An appeal 🙏 to all brothers and sisters from all social status and faiths. Please don’t resort to violence,stone throwing or lynching. Doctors,Nurses,Medics, Policemen etc..are endangering their lives to save you. We have to win this Coronavirus war together. Please. Jai Hind!🇮🇳
— Rishi Kapoor (@chintskap) April 2, 2020
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement