Nikki Tamboli: धनश्री वर्मा अन् अरबाजची जवळीक पाहून निक्कीचा जळफळाट! सोशल मिडियावर शेयर केली पोस्ट, म्हणाली 'अपना तो एक ही...'
Nikki Tamboli: राईज अँड फॉल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून धनश्री वर्मा आणि अरबाज या दोघांच्या केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जात आहे.

Nikki Tamboli: सध्या रिअॅलिटी शो राईज अँड फॉल (Rise And Fall Show) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून त्यातील स्पर्धकही तितकेच चर्चेत आहेत. यामध्ये सर्वाधिक चर्चेत आलेली जोडी म्हणजे धनश्री वर्मा (dhanashree varma) आणि अरबाज (arbaaz). या दोघांच्या केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले जात आहे. विशेष म्हणजे, अरबाज धनश्रीबाबत वारंवार पझेसिव्ह होताना दिसतो आहे. धनश्री इतर स्पर्धकांना भेटताना मिठी मारते, तेव्हा अरबाजला ते अजिबात पटत नाही. त्यामुळे तो तिला याबाबत प्रश्न विचारताना दिसतो आणि त्यावरून त्यांच्या नात्यातील रंगत शोमध्ये अधिक ठळकपणे दिसून येते. यावर धनश्री (dhanashree varma) म्हणते, 'ही माझी पद्धत आहे. मी सगळ्यांची गळाभेट घेते.’ यावर सोशल मिडियावर मात्र चांगलीच चर्चा रंगल्याचं चित्र दिसून येत आहे.
Rise And Fall Show: अपना तो एकही उसूल है..
पण या प्रकरणाबाबत मात्र अरबाजची गर्लफ्रेंड निकी तांबोळी चांगलीच भडकली असल्याचं दिसून येत आहे. निकी तांबोळीने तिच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून या प्रकरणावर पोस्ट शेअर केली आहे. निकीने इन्स्टा स्टोरी ठेवत याप्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या स्टोरीमध्ये निकी म्हणते, ‘अपना तो एकही उसूल है, यारी मे गद्दारी नही और गद्दारोंसे यारी नही.’ यानंतरही निकिने दुसरी स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये ती म्हणते, ‘जब शिकार का समय होगा, जंगल मे हम खुद आयेंगे.’ काय होती नेटीझन्सची रिएक्शन? अरबाजचा हा व्हिडियो व्हायरल होताच त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. याबाबत अनेकांनी अरबाजविरोधी कमेंट केल्या आहेत. अनेकांच्या मते, प्रत्येक रिअलिटी शोमध्ये त्याची हीच सर्वत्र अवस्था आहे. प्रत्येक शोमध्ये तो कोणाच्या तरी मागे लागलेला असतोच.
Rise And Fall Show: निकी अरबाजची लव्हस्टोरी
बिग बॉस मराठीच्या 5 व्या सीझनमध्ये निकी आणि अरबाज ही जोडी एकत्र आली होती. यांची आधी मैत्री मग प्रेम असा प्रवासही प्रेक्षकांच्या समोरच घडला. ते दोघे फिरायला गेल्यानंतर एकमेकांसोबतचे रोमँटीक फोटो देखील शेअर करत होते.
Rise And Fall Show: राईज आणि फॉल शोबाबत
अशनीर ग्रोवर होस्ट करत असलेल्या या राईज आणि फॉल शो अल्पावधीतच लोकप्रिय शोच्या यादीत पोहोचला आहे. हा शो अमेझोन प्राइमवर प्रसारित होतो आहे. 42 दिवस या शोचा कालावधी आहे. या शोमध्ये अर्जुन बिजलानी, नयनदीप रक्षित, आदित्य नारायण, पवन सिंह, किकू शारदा, कुब्रा सैत, आरुष भोला, अहाना कुमरा, संगीता फोगट, अनाया बांगर, बाली, आकृति नेगी और नूरिन शा. हे स्पर्धक आहेत.























