एक्स्प्लोर

Raudra : रहस्यमयी कथेचं नवं कोडं, ‘रौद्र’ चित्रपटाचा शानदार ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा दिमाखात संपन्न!

Raudra Marathi Movie : ‘रौद्र’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा सुप्रसिद्ध युवा संगीतकार निलेश मोहरीर यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला.

Raudra Marathi Movie : ऐतिहासिक दस्तावेज व त्यातील गूढता शोधण्याचा मोह प्रत्येकाला कधी ना कधी होत असतो. कधी उत्सुकतेपोटी तर कधी त्यामागे दडलेल्या गुपितांसाठी शोध घेतला जातो. शोधाची अशीच थरारक तितकीच रंजक कथा असलेला एम.जी पिक्चर्स निर्मित व अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.कंपनी प्रस्तुत ‘रौद्र’(Raudra) हा चित्रपट 1 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत अनावरण सोहळा सुप्रसिद्ध युवा संगीतकार निलेश मोहरीर यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला.

या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन रविंद्र शिवाजी यांनी केले आहे. थरार, उत्कंठा, शोध, संशय, समज-गैरसमज या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध या चित्रपटातून घेतला जाणार आहे.

‘रौद्र’ चित्रपटाच्या ट्रेलरची व गाण्यांची स्तुती करताना संगीतकार निलेश मोहरीर यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना अल्ट्रा मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’.कंपनीचे एमडी आणि सीईओ श्री. सुशिलकुमार अग्रवाल म्हणाले की, ‘आम्ही पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची प्रस्तुती केली असून ‘रौद्र’ चा विषय आम्हाला खूप भावला. या चित्रपटात नवीन कलाकार असून सगळयांनी छान काम केली आहेत. चित्रपट हा नेहमी चांगल्या कलाकारांनी बनतो’, असं सांगताना भविष्यात अधिकाधिक उत्तम चित्रपटांच्या निर्मीतीचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

चित्रपटातील मुख्य कलाकार राहुल पाटील आणि उर्मिला जगताप यांनी ही आपले मनोगत व्यक्त करताना चांगला चित्रपट करण्याची संधी दिल्याबद्दल निर्माता, दिग्दर्शक तसेच अल्ट्राच्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच हा चित्रपट प्रत्येकाला खिळवून ठेवेल असा विश्वास दिग्दर्शक रविंद्र शिवाजी व निर्माता मंगेश गटकळ यांनी बोलून दाखविला.

काय आहे कथानक?

वडगांव... एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेलं गाव....1970 सालचा काळ.... त्रिंबक कुरणे नामक जनगणना अधिकारी जनगणनेच्या निमित्ताने वडगांवला येतो. त्रिंबकला इतिहासात रुची असते. नानासाहेब कुलकर्णीं हे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती. ते त्रिंबकची राहण्याची सोय त्यांच्या जुन्या वाड्यावर करतात. त्या वाड्याबद्धल चिक्कार अफवा असतात. वाडाही भव्य व भयानक असा असतो. काहीं दिवसात त्रिंबकला विचित्र व भयावह आवाज ऐकू येतात. नानासाहेबांकडे एक पुरातन बखर आहे ज्यात गावाबद्दल ऐतिहासिक माहिती आहे हे त्रिंबकला समजते. या बखरीतवेगवेगळी कोडी असतात ज्यामार्फत रहस्याचा उलगडा होणार असतो.

नायिकेच्या मदतीने कोडयामधील महत्त्वाचा धागा त्याचा हाती लागतो. मात्र या शोधाला अचानक विश्वासघाताचं ग्रहण लागतं, तेव्हा होणारा विनाश आणि त्याचं ‘रौद्र’ रूप या चक्रात कोण आणि कसं अडकणार? हे पहाणं अतिशय औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे. या साऱ्याला एका अलवार प्रेमाच्या गोष्टीची अनवट किनारही लाभली आहे.

नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

राहुल पाटील आणि उर्मिला जगताप ही नवी फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. त्यांच्यासोबत  दीपक दामले, अनिता कोकणे, अमित पडवणकर, ईशान गटकळ आदि कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची कथा मंगेश बाळासाहेब गटकळ यांची असून पटकथा आणि संवाद रविंद्र शिवाजी यांचे आहेत. मंगेश बाळासाहेब गटकळ या चित्रपटाचे निर्माते तर सहनिर्माते समीर किसन गाडे आहेत. हर्षद गोलेसर, वैष्णवी अडोदे, शुभांगी केदार, शिरीष पवार या गायकांनी यातील गाणी गायली आहेत. संगीताची जबाबदारी अक्षय जाधव यांनी सांभाळली आहे. छायांकन स्वप्निल केदारे आणि संकलन आकाश मोरे यांचे आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
Govinda Sunita Divorce: गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
Embed widget